प्रज्ञा, शिल, करुना बुद्ध विहार मांडेसर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी. जयंती संपन्न
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथे दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी प्रज्ञा, शिल , करूना बौद्ध विहारात स्वतंत्र भारताचा पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ
अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौदध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. आनंदभाऊ मलेवार ( जिल्हा परिषद सदस्य पाचगाव ) उपाध्यक्ष मा.श्री.गुलाब भाऊ सव्वालाखे सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर प्रमुख अतिथी ग्रा.पं. सदस्य मा.श्री.डी.एन.भाऊ बोरकर, श्री.अजाबरावजी बावणे, मा. सुशांतजी लिल्हारे ( बाळू ) मा. मधुकरजी कुकवासे हे होते. आलेल्या पाहुण्यांनी आपआपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुती करतांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाले. ते प्रचंड बुद्धीमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळऊन देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जिवनात केल्या, समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला.
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा अशा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तुत्व गाजवणाऱ्या ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान होते असे आलेल्या पाहुण्यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.श्री.राहुलजी मेश्राम यांनी केले, त्यावेळी
प्रज्ञा शिल करूना कार्यकारणी मंडळ उपस्थीत होते.
अध्यक्ष – मा.श्री.राहुलजी मेश्राम
उपाध्यक्ष -मा.श्री.अनिलजी मेश्राम
सचिव – मा.श्री.मुकेश भसगवळे
सदस्य गण – श्री. रुपचंदजी मेश्राम, देवेन्द्र मेश्राम, हितेश भसगवळे, धमेंन्द मेश्राम, हेमंत डहाके, अनमोल मेश्राम, पवन भसगवळे, सुनील मेश्राम, अतुल मेश्राम, राजु डहाके
सुनंदा मेश्राम, रिना भसगवळे, चंदा मेश्राम, मालती भसगवळे, सोनाली मेश्राम, लीना भसगवळे
जोत्सना मेश्राम, हिरंजना मेश्राम,
पायल मेश्राम, मनीषा मेश्राम व गावातील मित्र मंडळ
मोनी शिंगाडे, भागरता डहाके, यमुना , नेहा शिंगाडे,प्रतीमा शिंगाडे, यशस्वी भसगवळे, प्रिनल मेश्राम धनश्री मेश्राम,सिद्धेस मेश्राम ताराबाई,मेश्राम,अमायरा मेश्राम, हिमांशु भसगवळे, धीरज मेटांग्रे, अभय मेश्राम, किंट्टु मेश्राम ,सोहम मेश्राम, दक्ष मेश्राम प्रतीग्या मेश्राम, मा. हावसुभाऊ नागपूरे ( सामाजिक कार्यकर्ता ) मा. मनोहर भाऊ राऊत उपस्थित होते. व शेवटी सगळ्यांचे आभार मानून महाप्रसाद वाटप केले. व कार्यक्रम समाप्त करण्यात आले.