ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वत्र “झिरो रॉयल्टी” मुरूम तस्करी
कुठं नाममात्र रॉयल्टी, कुठं झिरो रॉयल्टीने तालुक्यात बिनधास्त मुरूम चोरी
क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील सायगाटा, खेड,मालडोंगरी,बरडकिन्ही, कहाली, बोन्डेगांव आणि बऱ्याच ठिकाणी झिरो रॉयल्टी अथवा नाममात्र रॉयल्टी ने अवैध मुरूम तस्करी होत असतांना संबंधित साजातील तलाठी, मंडळ अधिकारी व तालुक्यातील महसूल अधिकारी मौनधारण करून ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याने बिनधास्त अवैध मुरूम तस्करी करीत सर्वांना मॅनेज करणाऱ्याच्या धाडसामागे नक्कीच जिल्ह्यातील मोठा जनप्रतिनिधी व महसूल अधिकाऱ्याचा हात असल्याशिवाय हे शक्य नसल्याची जनतेत सर्वत्र कुजबुज सुरु आहे.
जिल्ह्यात गौणखनिज चोरांना सध्या सुगीचे दिवस असल्याने युवा, होतकरू,सुशिक्षित,तरुण वर्ग आपल्या उज्वल भविष्याची चिंता न करता तात्पुरत्या समाधानासाठी, बळकट राजकारण असलेल्या पक्षाच्या झेंड्या खाली जातं आपली पोळी भाजून घेत वाम मार्गाला लागलेला आहे दरम्यान कुणाचा जीव जातं असेल तरी पर्वा नाही, “गंधा है पर धंदा है” अशा तयारीत तालुक्यातील तरुण आजघडीला तैनात दिसून येत आहे तर विरोधी पक्ष बळकट सत्ताधारी राजकारणाच्या प्रभावाने कुमकुवत होत नाममात्र निवेदनाच्या मार्गे जातं, सपशेल नांगी टाकलेल्या अवस्थेत तालुक्यात “अस्वस्थ” दिसून येत आहे.
भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी तर्फे विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांना अवैध गौणखनिज उत्खननाला आळा यावा याकरीता निवेदन देण्यात आले तर वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरी तर्फे सुद्धा झिरो रॉयल्टी मुरूम अवैध उत्खनन बंद व्हावे याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र जिल्ह्यातील बळकट राजकारणी व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तालुक्यात गौण खनिज उत्खननास सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे अशांना “जनाची नाही तर मनाची “असावी व तालुक्यातील कुठलाही होतकरू तरुण भविष्यात “पुष्पराज” होता कामा नये असे रोषवजा सुज्ञ व वडीलधाऱ्या जनतेतून याबाबत तीव्र भावना सर्वत्र प्रकट होत आहेत.