याप्रकरणी या अल्पवयीन मुलावर महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रेश्मा माने
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०
महाड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने यातून ही मुलगी गरोदर राहिल्याची घटना महाड तालुक्यातील कोतूर्डे आदिवासीवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी या अल्पवयीन मुलावर महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.कोतूर्डे आदिवासीवाडी येथील 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने तक्रारदार महिलेच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुली जवळ मागील दोन वर्षांपासून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले होते. होळी तसेच रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी या मुलीवर बलात्कार देखील केला. यातूनच ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आहे. याची माहिती घरच्यांना मिळताच मुलीच्या आईने महाड तालुका पोलीस ठाण्यात 16 एप्रिलला तक्रार दाखल केली आहे.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?
- पूर्व विदर्भातील १९ तालुके नक्षल प्रभावित घाेषित
- भारतामध्ये एक व्हायरस पसरत आहे…सोनिया गांधी यांचे देशाच्या नागरिकांना आवाहन
- राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करणारे “कबड्डीचे 100 महायोद्धे”
या प्रकरणातील मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांना या बाबत नोटीस पाठवण्यात आली असून मुलाला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी या अल्पवयीन मुलावर बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस .बी. अवसरमोल अधिक तपास करत आहेत.