नागभीड येथे जादुटोणा विरोधी जन प्रबोधन यात्रेचे जंगी स्वागत

50

15 एप्रिल ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत वर्धा,वरोरा,भद्रावती,चंद्रपूर,मूल,  गडचिरोली,ब्रम्हपुरी,नागभीड,गोंदिया,भंडारा, रामटेक व परत नागपूर अशी चार दिवसीय जादुटोणा विरोधी जनप्रबोधन यात्रेचे आयोजन

नागभीड येथे जादुटोणा विरोधी जन प्रबोधन यात्रेचे जंगी स्वागत

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीड: क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि महामानव विश्वरत्न बोधीसत्व प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त नागभीड येथिल आनंद बुद्ध विहार येथे जनप्रबोधन यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
15 एप्रिल ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत वर्धा,वरोरा,भद्रावती,चंद्रपूर,मूल, गडचिरोली,ब्रम्हपुरी,नागभीड,गोंदिया,भंडारा, रामटेक व परत नागपूर अशी चार दिवसीय जादुटोणा विरोधी जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही जनप्रबोधन यात्रा दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा पवित्र दीक्षाभूमी नागपूर येथुन विश्वरत्न महामानव, पं. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आरंभ करण्यात आली. दिनांक १७/५/२०२१ ला सकाळी १२ वाजता आनंद बुद्ध विहार नागभीड येथे पोहचली. यावेळी आनंद बुद्ध विहार येथील कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन चित्तरंजन चौरे राच्य कार्यकारी सदस्य हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारीणी सदस्य , प्रा.डाँ. युवराज मेश्राम , आनंद मेश्राम पञकार हे उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामभाऊ डोंगरे म्हणाले की, जनप्रबोधन याञे निमित्ताने सामान्य जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे,समाजाची दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धा, फसवणूक व शोषण करणारी बुवाबाजी यापासुन जनतेला सावध करणे,धार्मिक अनिष्ट प्रथा, परंपरा, जीर्ण रुढी, यांची सद्वविवेक बुद्धी ने चिकित्सा करायला लावणे,समविचारी समाजपरीवर्तनाच्या संघटना व चळवळी ला तसेच विवेकी संत वांड्मयाचा व शिकवणीचा पुरस्कार करणे,भारतीय राज्यघटनेचे मुल्य संवर्धन करणे,जनतेच्या मनातून अंधश्रद्धा समुळ नष्ट करणेसाठी बुवाबाजी व झाडफुक एक थोतांड असुन त्याचा भांडाफोड करण्यासाठी आम्ही येथे आलो. यावेळी अंधश्रद्धेवर पथनाट्य सादर करण्यात आले. हातचलाखी करुन दाखवन्यात आली. समाजात अनेक बाबा असतात. ते आपली कशी फसवणुक करतात हे दाखवन्यात आले.अंधश्रद्धेवर विविध प्रयोग करुन दाखविन्यात आले. यावेळी प्रा.डाँ.युवराज मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्तरंजन चौरे म्हणाले की, प्रबोधनाद्वारे मस्तिष्क प्रज्वलित होतो. प्रत्येक कारणामागे विज्ञान आहे. विज्ञाना शिवाय काहीही घळत नाही. जर अशा शोषणाला जर कुणी बळी पडत असल्यास ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013’ प्रमाणे शिक्षेची तरतूद आहे. जादुटोणा विरोधी कायद्याची चित्रमय पोस्टर्स कार्यक्रम स्थळी प्रदर्शित करुन जनतेत जागृती करन्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समिती ने हा संकल्प करुन जादुटोणा विरोधी कायद्याची जनप्रबोधन यात्रेचे आयोजन केले आहे.
ही एकमेव अशी यात्रा महाराष्ट्र राज्यात कुठेही अजुन पर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी कोणत्याही संघटनेने काढली नाही. या अनोख्या उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक जिल्ह्यात मिळत आहे.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

सदर जनप्रबोधन यात्राचे आयोजन महा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर कार्यकारिणी व उत्तर नागपूर शाखा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार आनंद मेश्राम तर संचालन मंगेश कोसे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृषभ खापर्डे, नरेश मेश्राम ,रजनी शेंडे, प्रीती डोंगरे,गिता खापर्डे, यशोधरा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.