दोन वर्षानंतर गावकऱ्यांनी घेतला या जत्रेचा आनंद

सचिन पवार
माणगांव तालुका प्रतिनिधी
मो.न: ८०८००९२३०१
माणगांव :- तालुक्यातील बामणोली येथील कालभैरव देवस्थान ची जत्रा उत्सव आज दिनांक १७ रविवार रोजी आयोजित करण्यात आली होती ही यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी भरविण्यात आली होती माघील दोन वर्ष लोकडाऊन तसेच कोरोना ला कंटाळेली पब्लिक मात्र आता तालुक्यातील जत्रेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
या यात्रेत बामणोली कलमजे गावातील गावकरी उंच काट्या व घाडडूपारत घेऊन जत्रा उत्सवात सहभाग घेतात बामणोली गावातील उंच काट्या रात्री ३ ते ४ वाजेपर्यंत घेऊन येतात या उंच काट्याना त्या गावचे निशाण असे म्हटले जाते ही जत्रा उत्सव १७ एप्रिल रोजी सुरु होऊन १८ एप्रिल रोजी पहाटे १० वाजेपर्यंत असते जत्रा पाहण्यासाठी आजू बाजूचे भाविक जत्रा उत्सवाला भेट देत असतात.
या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?
- दिवंगत अभिनेते इरफान खान यांना मरणोपरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
- महात्मा फुलेंची शाळा: वैभवी भिडेवाडा !
- कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी, मुळा मुठा नद्यांच्या विकासासाठी हजार कोटी रुपये मंजूर
सुरुवातीला देवाची लाट त्याच प्रमाणे जतर काटी फिरवताना दिसत होते हा आनंद दोन वर्षां नंतर पाहायला मिळत आहे.हनुमान जयंती मध्ये देवाची लाट फिरवतात त्याच प्रमाणे दुसऱ्या दिवशी मुलाचे खेळण्याचं दुकानें तसेच अनेक प्रकारची स्टॉल लावलेली पाहायला मिळत होती गावकरी देवाची पालखी तसेच जतर काट्या घेऊन नाचत गाजत मंदिराला फेरा मारून गावातून पालखी तसेच उंच अश्या जतर काट्या घेऊन मिरवीत असताना पाहायला मिळाले या जत्रेचा आनंद दोन वर्षानंतर गावकरी तसेच तालुक्यातील भाविकांनी घेतला.