समर्थ महाविद्यालय लाखनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
लाखनी :- भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणारे मौजा लाखनी येथे दिनांक १८ एप्रिल २०२२ रोज सोमवारला राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालीत समर्थ महाविद्यालयात सन २०२०-२१ गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणगौरव सोहळा भगिनी निवेदीता सभागृहात आयोजित करण्यात आला असून तो आज १८ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा. वसंत जाधव सर, आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सुमंत देशपांडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, कार्यकमाचे संयोजक प्रा. धनंजय गिरिपुंजे, आणि पारीतोषिक वितरण प्रमुख डॉ. संगीता हाडगे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहीजे. कोणतेहि कार्य करते वेळी हिम्मत न हारता सतत प्रयत्न करत राहणे हाच विद्यार्थी धर्म आहे. यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी मिळऊन आपले ध्येय गाठावे असे मार्गदर्शन प्रमुख भाषणातून पोलीस अधिक्षक भंडारा मा. वसंत जाधव सर या कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
सतत प्रयत्न करत रहा, आणि तुमच्यातील कला कौशल्य व तुमच्यातील गुणवत्ता ओळख आणि त्यानुसार जास्तित जास्त प्रयत्न करा, यश तुमच्या पदरी पडणारचं असे प्रमुख वक्ते प्रा. सुमंत देशपांडे या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी गुणवंत प्राप्त विद्यार्थांच्या गौरव सत्कार करुण पुढील वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पारितोषीक मिळाले पाहीजे यासाठी या विद्यार्थांनी प्रेरणा घ्यावी असे आव्हाहण त्यांनी या कार्यक्रमात केले.
या प्रसंगी या कार्यक्रमात कु. प्रणाली मते, शीतल गभणे, मोनिका गायधने, शील बागडे, प्रेरणा कान्हेकर, पर्नवी गायधने, पूजा मेश्राम, निकीता हटवार, सुरेश वलथरे, दामिनी मेश्राम, चेतना मते, विशाखा कुथे, आरति रणदिवे, दिव्या तितिरमारे, भरत कागसर्पे, आर्या सिंगणजुडे, आर्या वालोदे, भाग्यश्री नंदेश्वर, श्रेयस लांजेवार, चंद्रहास खंडारे, सीमा बोडणकर, बैस्णवी मेश्राम, या संपूर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.
तर अष्टपैलु विद्यार्थी म्हणून ज्ञानेश ढेंगे, या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुरेश बंसपाल, प्रा. लालचंद मेश्राम, प्रा. धनंजय गिरिपुंजे, लेप्ट बाळकृष्ण रामटेके, डॉ. संगिता हाडगे, डॉ. सुनंदा रामटेके, डॉ. बंड चौधरी, डॉ बी पर्वते, डॉ. सचिन रहांगडाले, प्रा. प्रविण पटले, रीना साठवणे, योगराज डोरलिकर, अशोक गायधनी, प्रशांत वंजारी, सुरेश केदार, अजिंक्य भांडारकर, मंगेश शिवरकर, प्रणय भांडारकर, श्याम पंचवटे, मोहण कावळे, दिनेश सलामे, माजी प्राध्यापक आणि समस्त विद्यार्थी विद्यार्थीनी हे या वेळेस मोठ्या संख्येने उपस्तित होते. या सगळ्यांचा आभार माणून कार्यक्रम समाप्त केले