मौजा हरदोली येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटाने सौ. पुस्तकला धानाजी गायधने यांचे राहते घर जळून खाक मदत करण्याची केली विनवणी, आपल्या परिने जे काही देता येईल ती आपण मौजा हरदोली येथील ग्रामपंचाय येथे जमा करावी अशी अपिल केली आहे

मौजा हरदोली येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटाने सौ. पुस्तकला धानाजी गायधने यांचे राहते घर जळून खाक

मदत करण्याची केली विनवणी, आपल्या परिने जे काही देता येईल ती आपण मौजा हरदोली येथील ग्रामपंचाय येथे जमा करावी अशी अपिल केली आहे

मौजा हरदोली येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटाने सौ. पुस्तकला धानाजी गायधने यांचे राहते घर जळून खाक मदत करण्याची केली विनवणी, आपल्या परिने जे काही देता येईल ती आपण मौजा हरदोली येथील ग्रामपंचाय येथे जमा करावी अशी अपिल केली आहे
✍ मिथुन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
📱8806764515 📱

मोहाडी :- सविस्तर वृत्त येणे प्रकारे आहे की भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा हरदोली (झं) येथे दिनांक १८ एप्रिल २०२२ रोज सोमवार रोजी चंद्रप्रकाश धानाजी गायधने यांचे राहते घर पुर्णतः हा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर पुर्णपणे जळून घराची राख रांगोळी झाली आहे.
श्री. चंद्रप्रकाश व त्यांची आई हे वनमजूरी करुण आपले उदरनिर्वाह चालवीत असे पण अचानक काल त्यांच्यावर शंकट कोसळले, या संकटात संपूर्ण घर, पैसे, खाण्यापिण्याचे अणाज, त्यामधे धान, गहु, तांदुळ, दाळ, चणे, चनी, लाखोरीची दाळाची, चुंगळ, चना दाळ, पांघरण्याचे संपूर्ण पांघरण, त्यामध्ये वाकर, वगेरे, भांडी, कुलर, पंखा, दिवान, आरमारी, सोफासेड, स्वयंपाक बनविण्याचे गॅस सिगडी, बरतन, पाणी पिण्याची ग्लास सुद्धा वाचली नाही.
अशा या भयंकर विस्फोटाने आगच आग घरा सभोवताल दिसत होते. गॅस सिलेंडरणे विस्फोट झाल्याने घरापासुन वंचीत झाले, त्यांना आता राहण्यासाठी दुसरा घर नाही. खायला अणाज नाही, पाणि प्यायला ग्लास बरतन सुद्धा वाचले नाही. अशा गंभिर परीस्थीतीत सरकारी स्वस्त धान्य दुकान मौजा हरदोली येथील राशन दुकानदार श्री. नवनाथजी गायधने यांच्या कडून नुकसान ग्रस्त चंद्रप्रकाश धानाजी गायधने परिवारास २५ किलो गहु, २५ किलो तांदुळ वाटप करण्यात आले. ग्राम पंचायत हरदोलीचे सरपंच मा. सदाशिवजी ढेंगे, मा. हेमराजजी झंझाड, माजी सरपंच विद्याताई नवनाथजी गायधने, रुपेशजी झंझाळ, लंकेशजी पुड्के, उपस्थित होते.
नुकसानग्रस्त कुटुंबीयाने गावकर्यांपूढे मदतीची अपील केली आहे. करीता आपण ज्या कोणास जेवढी मदत करता येईल आपण कृपया ग्राम पंचायत कार्यालय हरदोली ( झं) येथे जमा करण्याची अपिल नुकसानग्रस्त कुटूंबांनी केली आहे.
करीता आपण जेवढी जास्तीत जास्त मदत करू शकता तेवढी मदत केली पाहिजे अशी हात जोडून विनंती केली जात आहे.