सत्तावीस बंधारे आणि एक साठवण टाकी इत्यादींची आमदार भरत शेठ गोगावले यांनी केली मागणी

51

महाड विधानसभा मतदार संघात २७ बंधारे आणि १ साठवण टाकीची स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने गोगावले यांच्या वतीने मागणी

सत्तावीस बंधारे आणि एक साठवण टाकी इत्यादींची आमदार भरत शेठ गोगावले यांनी केली मागणी

राकेश सुरेश देशमुख 
महाड शहर प्रतिनिधि
मो.7887879444/8087462957

मंत्री गडाख यांच्याकडे गोगावले यांनी महाड विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान होऊन पाणीसाठा मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे, त्या संदर्भात माननीय मंत्री महोदयकडे आमदार गोगावले यांच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, सदर मागणीची दखल घेत मंत्रीमहोदयांनी आज महाड पोलादपूर आणि माणगाव इत्यादी ठिकाणीची माहिती घेऊन आढावा घेतला.

मंत्री गडाख यांच्याकडे महाड विधानसभा मतदार संघात २७ बंधारे आणि १ साठवण टाकीची स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने गोगावले यांच्या वतीने मागणी करण्यात आली.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

या मागणीची पूर्तता करण्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रिमहोदयांनी सूचना दिल्या
कारण या बंधाऱ्यामुळे पुढच्या वर्षीपासून पाणीटंचाईला या गावांना सामोरे जावे लागणार नाही या बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे आजूबाजूच्या आणि खालील गावांना पाणी मुबलक मिळेल अशी मागणी गोगावले यांनी मंत्री महोदयांनी कडे केली.

या बैठकीसाठी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ,महाड विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार माजी जिल्हा परिषद सदस्य मुरली दरेकर अविनाश शिंदे बबन शिंदे तसेच तालुक्यातील इतर ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी इत्यादी उपस्थित होते.