ओवळे येथे औद्योगिक विकास महामंडळाच्या दूषित सांडपाण्यामुळे खाडी पट्ट्यातील जनता हैरान

67

कारखान्यातील दूषित सांडपाणी पाईपलाईन द्वारे सावित्री नदीच्या पात्रात सोडल्याने सावित्री नदीचे पात्र हे फेसाळमय झाले आहे

ओवळे येथे औद्योगिक विकास महामंडळाच्या दूषित सांडपाण्यामुळे खाडी पट्ट्यातील जनता हैरान

राकेश सुरेश देशमुख
महाड शहर प्रतिनिधि
मो.७८८७८७९४४४ / ८०८७४६२९५७

महाड तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या कारखान्यातील दूषित सांडपाणी पाईपलाईन द्वारे सावित्री नदीच्या पात्रात सोडल्याने सावित्री नदीचे पात्र हे फेसाळमय झालेअसून सावित्री नदीतील मासे मरून पडल्याने दुर्गंधीचा प्रादुर्भाव संपूर्ण वातावरणात बिघडल्याने खाडी पट्ट्यातील जनतेच्या आरोग्यात बदल झाला आहे.

यात दमा रोग फुफुसचा कॅन्सर, इत्यादी रोगांना सामोरे जावे लागत आहे. ओवळे येथे सतत प्रवासी वर्गाची रहदारी असल्याने प्रवासी वर्ग या दुर्गंधीने हैराण झाले आहेत. सावित्री नदीच्या पात्रात दररोज खाडी पट्ट्यातील जनावरे पाणी पिण्यासाठी फिरकत नाही.

या सांडपाण्यामुळे शेतकरी वर्ग शेती करण्यास सुद्धा घाबरत आहे.कित्येक वर्ष शेती सांडपाण्यामुळे दूषित झाली आहे. खाडीपट्ट्या लगत असणारी गोठे.कुंबळे.जुई.वराठी. वलंग. तेलंगे.दाभोळ.कोकरे.चिंभावे.आंबेत या गावांना सुद्धा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.रासानिक
सांडपाण्यामुळे पावटा तूर, मुग अशी कडधान्य नापीक झाली आहेत.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

या सांडपाण्याच्या विरोधात खाडी पट्ट्यातील जनतेने बराच वेळ एमआयडीसी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. परंतु अधिकारी वर्गाने त्याच्यावर दुर्लक्ष केले तरी लवकरात लवकर हे सांडपाणी ओवळे येथे न सोडता बाणकोट खाडीत सोडण्याची मागणी खाडी पट्ट्यातील जनतेनी केली आहे.