रायगड जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

54

गावात एक ही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता  घोषवाक्ये म्हणत इयत्ता पहिलीच्या मुलांना बैलगाडीत बसवून त्यांना फुगे व चॉकलेट देऊन मान सन्मानाने बैलगाडीतून शाळेकडे आणले जात होते

रायगड जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

किशोर किर्वे
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड तालुक्यातील पिंपळदरी येथील रायगड जिल्हा परिषद शाळा येथे शासनामार्फत राबवत असलेल्या शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातून पहिलीच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली होती यावेळी मेळाव्यात मुलींनी लेझिम पथकाची तर मुलांनी वारकारी पथकाची सादरीकरण केल तसेच गावात एक ही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता मुले घोषवाक्ये म्हणत इयत्ता पहिलीच्या मुलाला बैलगाडीत बसवून त्यांना फुगे व चॉकलेट देऊन मान सन्मानाने बैलगाडीतून शाळेकडे आणले जात होते.

प्रभातफेरी झाल्यानंतर शाळेत मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उदघाट्न गावातील प्रतिष्ठित नागरिक सुदाम शेटे यांच्या शुभहस्ते झाले तर यावेळी गाव कमिटीचे अध्यक्ष विजय पवार,सुरेश पवार,चंद्रकांत सावंत शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश पवार कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक रमेश देठे सर, व शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक प्रशांत माने सर तसेच अंगणवाडी ताई संध्या पवार,मदतनीस संध्याताई मालुसुरे तसेच याप्रसंगी गावातील पालक वर्ग,प्रतिष्ठित नागरिक व नवतरुण मित्र मंडळ व युवतींचा ही सहभाग मोलाचा होता.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचल्यात का?

 

यावेळी शाळेत 7 टेबल मांडण्यात आले होते प्रत्येक टेबलवर इयत्ता 1 लीच्या मुलांच्या बुद्धीला चालना देणारे खेळ मांडण्यात आले होते व मुलांच्या पूर्व ज्ञानावर आधारीत त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न विचारण्यात येत होते उत्तर सांगितिल्यानंतर त्यांना खाऊ वाटप करण्यात येत होता मेळावा अतिशय उत्साहात पार पडला असून शिक्षकांचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले.