➡️यंदाच्या पावसाळ्यात देखील मुंबई गोवा महामार्ग अर्धवटच ➡️अपघाताची मालिका सुरूच राहणार ➡️मागील वर्षी पेक्षा अपघातांच्या आकडेवारी मध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता

➡यंदाच्या पावसाळ्यात देखील मुंबई गोवा महामार्ग अर्धवटच

➡अपघाताची मालिका सुरूच राहणार

➡मागील वर्षी पेक्षा अपघातांच्या
आकडेवारी मध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता

➡️यंदाच्या पावसाळ्यात देखील मुंबई गोवा महामार्ग अर्धवटच ➡️अपघाताची मालिका सुरूच राहणार ➡️मागील वर्षी पेक्षा अपघातांच्या आकडेवारी मध्ये यंदा वाढ होण्याची शक्यता

✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्या च्या कामाला १९/१२/२०११ ला सुरवात झाली जवळ पास ११ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असला तरी अध्याप ही काम अर्धवटच आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला ५ वर्ष पूर्ण झाली असली तरी हे ही काम अर्धवटच आहे मात्र जी अपघाताची मालिका गेली अनेक वर्षा पासून या महामार्गावर सुरू होती ती पुढे देखील सुरूच राहणार असून मागच्या वर्षाच्या आकडे वारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला जवळ पास ११ वर्षाचा कार्य काळ उलटून गेला आहे . सध्या हा ५५० किलोमीटरचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याचा नाव घेत नाही. ज्या प्रमाणे सुरवातीला या मार्गाच्या कामाला गती मिळाली होती ती मात्र शेवट पर्यंत कायम राहिली नाही त्याचे कारण अनेक अडचणी येत गेल्या आणि हे काम थांबत गेले कोकणात येणारे पर्यटक सणा सुदी जाणारे चाकरमानी वाहतूकदार पर्यटक यांची संख्या पहिली तर दर वर्षी या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरूच असते आज ही कामाची गती पहिली तर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल की नाही पूर्ण झाला तर कधी होईल हा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाला ११ वर्ष पूर्ण झाली सुरवातीला ८४ किलोमीटरचे काम डांबरी करणात होते या टप्प्याचे २० टक्के काम झाले असले तरी पुन्हा ११ वर्षानंतर ८४ किलोमीटर च्या या महामार्गाच्या कामाची पुन्हा काँक्रीटी कर्णाची निविधा काढण्यात आली पूर्वी चे डांबरीकरण पूर्णपणे काढून नवीन काँक्रिटीकरण याची प्रक्रिया राबविली जाणार आहे अशा परिस्थितीत या ठिकाणी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा पहिला टप्पा एक वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन देत ४५० कोटी रुपये कामा साठी मंजूर देखील केले आहे नवीन काम करत असताना जुने झालेले डांबरीकरण पुन्हा उखडून काढावे लागणार आहे मात्र यालाच किती कालावधी लागणार आहे ८४ किलोमीटर चौपदरीकरण करणाच्या डांबरीकरण करण्याच्या कामाला ११ वर्ष लागली तरीदेखील हे काम पूर्ण नाही मग याच ८४ किलोमीटरचे चार( फोर लेन) म्हणजेच ३३६ किलोमीटर चे काम १ वर्षात होईलका पूर्वी देखील या कामावर पैसे मंजूर असताना ११ वर्ष उलटून देखील ८४ किलो मीटर चे काम पूर्ण झाले नाही मग पुन्हा किती वर्षे या कामाला लागणार हा प्रश्न मात्र अध्याप कायमच आहे या टप्प्यात अनेक वळणे आहेत दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अर्धवट ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी बाह्य वळण आज ही आहेत त्या मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. एक वर्षात काम पूर्ण होणार कामाचा नारळ फोडला गेला परंतु अध्याप कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गावर पूर्वी सारखी अपघातांची मालिका सुरूच राहणार आणि पूर्वी पेक्षा जास्त अपघात होण्याची शक्यता अनेक वाहतूकदार व तज्ञ मंडळींकडून कडून वर्तवली जात आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे दोन टप्पे तयार करण्यात आले पहिला पळस्पे ते इंदापूर व त्यानंतर इंदापूर ते गोव्या च्या सीमे पर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचे संपूर्ण ५५० किलोमीटर चे काम आहे दुसऱ्या टप्प्यात जमीन मालकांचे वाद वनखात्याच्या नाहरकत प्रमाण पत्र त्या मुळे दुसऱ्या टप्प्याचे देखील मोठया प्रमाणात काम रखडले आशा प्रस्थित पुढील एक वर्षाच्या कालावधीत महामार्गाचे काम पूर्ण होणे शक्य नाही ज्या ठिकाणी अनेक वळणांवर काम अर्धवट आहे अश्या ठिकाणी येत्या पावसाळ्यात डोंगर रस्त्यावर येणे या घटना होणारच आहेत त्यामुळे या महामार्गावर अपघातांचा धोका कायमच आहे.
२०२१ या वर्षाची आकडेवाडी पहिली तर संपूर्ण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पळस्पे ते तळकोकणा पर्यंत ३४८ अपघात झाले या मध्ये ४५७ प्रवाशी जखमी झाले तर ८० लोकांचा बळी गेला . या महामार्गाचे चौपदरी करणाचे काम पूर्ण झाल्यावर तरी ही अपघात मालिका कमी होईल का असा प्रश्न सामान्य कोकण वासीयांना पडला आहे. गेली १० वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही या पुढे कधी होणार हा प्रश्न या ठिकाणी अध्याप कायम आहे.यंदाच्या पावसाळ्यात मात्र या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही त्या मुळे महामार्गाचे राहिलेले अर्धवट काम व वळणावरची अर्धवट कामे, बाह्य वळणे ही येणाऱ्या पावसाळ्या मध्ये अपघातांना अमंत्रण देणार आहेत त्या मुले गेल्या वर्षीच्या अपघातांच्या आकडेवारीमध्ये मध्ये मोठ्या संख्येने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here