शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी, हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचे संतापजनक विधान.

शेतकऱयांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत, असे तारे खट्टर यांनी तोडले. त्यामुळे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता आहे.

हरयाणा:- आणि केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाहीला न जुमानता हजारो शेतकरी दिल्लीत पोहोचत असताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी संतापजनक वक्तव्य केले आहे. शेतकऱयांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत, असे तारे खट्टर यांनी तोडले. त्यामुळे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता आहे. खट्टर यांनी आधी शेतकऱयांची माफी मागावी. त्यांचा पह्न मी उचलणार नाही, अशी आक्रमक भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घेतली आहे.

केंद्र सरकारने घाईगडबडीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात संताप आहे. विशेषतः पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. हरयाणातील भाजप सरकारने पंजाबमधून आलेल्या शेतकऱयांवर लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या, कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले. सरकारनेच रस्ते खोदून दिल्लीकडे जाण्यास रोखण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी मागे हाटले नाहीत. शुक्रवारी पेंद्र सरकार नमले आणि दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानावर आंदोलनास परवानगी दिली. पण शेतकऱयांना रामलीला मैदान पिंवा जंतरमंतरवर आंदोलन करायचे आहे. हा संघर्ष कायम असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी संतापजनक वक्तव्य केले. शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. या आंदोलनात खलिस्तानवादी आहेत. यासंदर्भातील रिपोर्ट आमच्याकडे आहेत, असे खट्टर म्हणाले.

शेतकरी आक्रमक; पंतप्रधानांचा पुतळा जाळला
बुराडी येथल निरंकारी मैदानावर नाहीतर जंतरमंतर पिंवा रामलीला मैदानावर आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम आहेत. रामलीला मैदानाकडे निघालेल्या हजारो शेतकऱयांना दिल्ली पोलिसांनी सीमेवरच रोखले.
राजधानी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱयांचे तिसऱया दिवशीही आंदोलन सुरूच होते. पश्चिम उत्तर प्रदेशातून अनेक शेतकरी आंदोलनात सामील झाले आहेत. दरम्यान, काही शेतकरी बुराडी मैदानावर पोहोचले आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. मात्र, हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. संतप्त शेतकऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here