रा. जि. प. शाळा आकले येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा संपन्न

रा. जि. प. शाळा आकले येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा संपन्न

रा. जि. प. शाळा आकले येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा संपन्न

✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : -राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे व जिल्हा प्रशिक्षण संस्था पनवेल रायगड अंतर्गत महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा आकले येथे शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम पथकाने सादरीकरण करून केले.

मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत गायन केले व गुलाबपुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात उपशिक्षिका संगीता सावळे यांनी मेळाव्याची सविस्तर माहिती दिली.

वातावरण निर्मितीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व बालगीतेही सादर केली गेली. पाहुण्यांच्या स्वागता नंतर स्टॉल परिचय देण्यात आला. यात प्रामुख्याने सात स्टॉल लावण्यात आले होते ज्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, अंगणवाडी ताई यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रत्येक स्टॉल अंतर्गत घेण्यात आले. यात प्रामुख्यानेः विकास पत्र व नावनोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पूर्वतयारी, पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन असे स्टॉल लावण्यात आले होते.

दाखलपात्र विद्यार्थी यांचा कृतियुक्त सहभाग घेण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून काम केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच संदीप झांजे ,
प्रभाकर बांदल,
शिक्षण प्रेमी राजाराम माने ,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश खोपकर,
शा.व्य. सदस्या उर्मिला पटेल,
योगेश झांजे
ग्रामपंचायत सदस्या स्नेहल खैरे,
निताताई झांजे,
आरती खोपकर
जेष्ठ समाजसेविका शशिताई साळुंके ,
अंगणवाडी ताई सुनीता झांजे,वर्षा सकपाळ
शाळेचे मुख्याध्यापक मधुकर दासगावकर, विषय शिक्षिका पूजा शहा, उपशिक्षिका संगीता सावळे , मनीषा लोखंडे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर मेळाव्याचे सुत्रसंचालन विषय शिक्षिका पुजा शहा यांनी केले.तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका संगीता सावळे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here