सकमूरच्या दोन सदस्यांचे पद रद्द मा जिल्हाधिकार्यांचा आदेश रेचनकरांना धक्का

 

सकमूरच्या दोन सदस्यांचे पद रद्द

मा जिल्हाधिकार्यांचा आदेश

रेचनकरांना धक्का

सकमूरच्या दोन सदस्यांचे पद रद्द मा जिल्हाधिकार्यांचा आदेश रेचनकरांना धक्का

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-ग्रामपंचायत सकमूरच्या दोन सदस्यांचे पद रदद करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नूकताच यासंदर्भातील आदेश पारित केला आहे.या निकालामुळे बाजार समितीचे माजी उपसभापती आमदार सुभाष धोटे यांचे खंदे समर्थक अशोक रेचनकर यांना चांगलाच धक्का बसला आहे.
सन २०२१ या वर्षी ग्रामपंचायत सकमूर ची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत अशोक रेचनकर व ताराबाई झाडे हे दोन उमेदवार विजयी झाले होते.दरम्यान सकमूर येथील संदेश काळे व शाहिराज अलोणे यांनी रेचनकर व झाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.व ग्रामपंचायत आधिनीयम १९५८ चे कलम १४(१) (ड)यानुसार विविध पुरावे सादर करित अपात्र करण्याची मागणी केली.
अशोक रेचनकर हे सन २०१५-१९ या सत्रात सकमूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते.यावेळी रेचनकरांनी पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप होता.याप्रकरणाची तक्रार झाल्यानंतर अप्पर आयुक्ताने रेचनकराचे उपसरपंचपद रदद केले.रेचनकरांनी अपील केली पण ती अमान्य करण्या त आली.ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र घोषित केलेल्या तारखेपासून पाच वर्षापर्यत संबंधितास निवडणूक लढविता येत नाही. पण सन २०२१सत्रात झालेल्या निवडणूकीत अशोक रेचनकर नियमांना डावलून उभे राहिले व विजयी झाले.
दरम्यान याप्रकरणी संदेश काळे यांनी तक्रार केली.
दुसरीकडे शाहिराज अलोणे यानी ग्रामपंचायत सदस्य ताराबाई झाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.झाडेच्या कुटुबियानी अतिक्रमण केले आहे.त्यामूळ त्याचे सदस्यत्व रदद करावे अशी मागणी केली.
या दोन्ही प्रकरणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश पारित करित रेचनकर व ताराबाई झाडे या दोघांचेही सदस्यत्व रदद केले.
अशोक रेचनकर हे आमदार सुभाष धोटे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.त्यांचे पद रदद झाल्याने आता राजकीय वर्तुळात याप्रकरणाची चर्चा सूरू आहे.