श्रीवर्धन च्या प्रवेश दाराजवळ आग. आगीवार नियंत्रण मिळवण्यात यश.

श्रीवर्धन च्या प्रवेश दाराजवळ आग. आगीवार नियंत्रण मिळवण्यात यश.

श्रीवर्धन च्या प्रवेश दाराजवळ आग. आगीवार नियंत्रण मिळवण्यात यश.

✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱

श्रीवर्धन:-काल शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री अचानक श्रीवर्धन येतील मुख्य प्रवेश दाराजवळ ठिक 11वाजून ८ मिनिटांनी श्री. शर्मा यांच्या खिडक्या दरवाज्या बनवण्याच्या दुकानाला आग लागली. तिथे अनेक प्रकारचे दुकानें लागूच आहेत. त्या मध्ये श्री. राकेश पाटील यांचे वेल्डिंग चे दुकान आहे. त्यांच्या दुकानात वेल्डिंग साठी लागणारे गॅस दुकानात असतात. त्याच प्रसंग सावधानता म्हणून प्रत्यक्ष दर्शकाने श्री राकेश पाटील यांना फोन करून घटना घडल्याचे सांगितले. पाटील यांनी शर्मा यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तो पर्यंत आग मोठया प्रमाणावर लागली होती.तेथील जमवाने पाण्याच्या बदल्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते.
प्रसंगी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्रीवर्धन नगर परिषदेला फोन करून फायर ब्रिगेट ची गाडी मागवून घेण्यात आली. नगर पालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी त्वरित सेवा देऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.