गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरित मदत मिळावी,
शिवसेनेची मांगनी
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड –तालुक्यात गारपीट तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे ताबडतोब सर्वेक्षण करून पंचनामा करावा आणि नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना तात्काळ मदत करावी, नागभिड तालुका शिवसेनेचे मागणी केलेली आहे,
नागभीड तालुका हा धानपिक पट्टा म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्यामुळे या तालुक्याची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे, या तालुक्यातील बऱ्याचशा भागात, शेतकरी उन्हाळी धानपिक घेत असून एप्रिल महिन्याच्या शेवटी कापणी करून मळणी करीत असतात, तसेच भाजीपाल्याची लागवड करून, तालुक्यातील जनतेची दैनंदिन गरज पुरवीत असतात, अशातच दिनांक २३ एप्रिल रोज शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील नाग भिड़, तळोधी, गोविंदपूर, वाढोना,गिरगाव, हुमा, मांगरूळ,खडकी, नांदेड, सावरगाव इत्यादी भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
तरी नुकसानग्रस्त शेतीचे लवकरात लवकर सर्वेक्षण करून पंचनामा करावा आणि जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांना ताबडतोब नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यात यावा, या प्रकारचे निवेदन, मुकेशभाऊ जीवतोडे जिल्हा प्रमुख, अमृतभाऊ नखाते उप-जिल्हा प्रमुख, भोजराजभाऊ ज्ञानबोनवार तालुका प्रमुख शिवसेना यांचे मार्गदर्शनात आणि मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात तसेच बंडूभाऊ पांडव उप-तालुका प्रमुख, नाझीम शेख युवासेना समन्वयक, गिरीश नवघडे विभाग प्रमुख,अमोल मांढरे युवासेना उप-शहर प्रमुख, अमोल जनबंधु शाखा प्रमुख, वैभव कुंभरे, नरेंद्र मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीत, मा. चव्हाण साहेब तहसीलदार नागभीड यांना देण्यात आले.