मौजा पांढराबोडी येथे धर्मपाल अरविंद चव्हान याने आंब्याचा झाडाला गळफास लाऊन केली आत्महत्या गळफास लावण्याचा कारण अद्याप स्पष्ट नाही. दोन्ही पाय जमिनींवर असल्यामुळे घातपाताचा संशय नाकारता येत नाही

मौजा पांढराबोडी येथे धर्मपाल अरविंद चव्हान याने आंब्याचा झाडाला गळफास लाऊन केली आत्महत्या

गळफास लावण्याचा कारण अद्याप स्पष्ट नाही.

दोन्ही पाय जमिनींवर असल्यामुळे घातपाताचा संशय नाकारता येत नाही

मौजा पांढराबोडी येथे धर्मपाल अरविंद चव्हान याने आंब्याचा झाडाला गळफास लाऊन केली आत्महत्या गळफास लावण्याचा कारण अद्याप स्पष्ट नाही. दोन्ही पाय जमिनींवर असल्यामुळे घातपाताचा संशय नाकारता येत नाही

✍ मिथुन लिल्हारे ✍

मोहाडी तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8806764515

मोहाडी :- सविस्तर वृत्त येणे प्रमाणे आहे की, भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा पांढराबोडी ( हरदोली झं ) येथे दिनांक २१ एप्रिल २०२२ रोज गुरुवार रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजता दरम्यान आंब्याचा झाडाला साडीने गळफास लावण्याची घटना उघडकीस आली.
आंब्याचा झाडाला साडीने गळफास लाऊन शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटनेमुळे मोहाडी तालुक्यातील मौजा पांढराबोडी ( हरदोली झं ) या परिसरात खळबळ उडाली आहे.
नामे धर्मपाल अरविंद चव्हान वय ४५ वर्षे रा. पांढराबोडी, पोष्ट हरदोली झं., तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा असे मृतकाचे नाव आहे.
धर्मपाल यांचा मृतदेह त्यांच्या मालकिच्या शेतातील आंब्याचा झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. परंतू त्यांचे दोन्ही पाय जमिनीवर असल्यामुळे गळफास लाऊन कसकसा मेला हा संशय निर्माण झाले आहे. यात घातपाताचाही संशय नाकारता येत नाही. गळफास लावण्याचा कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परिसरातील लोकांमध्ये कर्जबाजारी झाल्याने शेतात धान, गहु, चना, लाख लाखोरी होत नाही. आणि कर्ज जास्त असल्याने त्याची परतफेड कुठून करणार अशी चर्चा परीसरातील लोकांमध्ये कानफुस चर्चा सुरु असल्याची वार्ता पुढे आली असुन कर्जापायी गळफास लावली असेल अशी शंका आहे.
या प्रकरणी आंधळगाव पोलीस स्टेशन यांना माहिती मिळताच ताबडतोब आंधळगाव पोलीसांनी घटनास्थळ गाठले. व पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा करून मर्ग दाखल केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे पाठविण्यात आले. वैद्यकिय अहवालात कारण स्पष्ट होईल. पुढील तपास आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. श्रीवाते सर, मा. गणेश पडवाळ, व पोलीस सहकर्मी पुढील तपास करीत आहे