आपले सरकार सेवा केंद्र चालकायाची तालुका व्यवस्थापक पदी वर्णी

आपले सरकार सेवा केंद्र चालकायाची तालुका व्यवस्थापक पदी वर्णी

आपले सरकार सेवा केंद्र चालकायाची तालुका व्यवस्थापक पदी वर्णी

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूर- आधुनिक तंत्रज्ञान युगात संगणकाचे खूप महत्व वाढत आहे, याच धर्तीवर महाराष्ट्रात आपले सरकार सेवा केंद्र हे प्रकल्प शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात तालुका व्यवस्थापक, केन्द्र चालक म्हणून गावपातळीवर कार्यरत आहेत, वरोरा पंचायत समिती येथे तालुका व्यवस्थापक हे पद काही महिन्यापासून रिक्त आहे. प्रकल्पाची कामे हे पद रिक्त असल्यामुळे खोडंबली होती. मागील काही महिन्यात जवळपास तीन तालुका व्यवस्थापक यांनी राजीनामा दिला होता परंतु या प्रकल्पाचे ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीला नियुक्त करून काही फायदा नाही असे लक्षात येताच जिल्हा स्तरावरून सध्या कार्यरत केंद्र चालक एकार्जूना ग्रा. पं. या गरीब केंद्र चालक याची तालुका व्यवस्थापक या पदी नियुक्ती करण्यात आली जेणेकरून प्रकल्पाच्या कामकाजात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. यासाठी वरोरा तालुक्यातील केंद्र चालक संघटने कडून आमच्या पैकी एकाला बढती देण्यात आली याकरिता आभार मानले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here