महाडमधील मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२७६८०
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे व त्यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल सरकारने कारवाई करावी अशी मागणी करत ३ मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर मस्जीदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असे सांगितल्याने आज सुरु केलेल्या धरपकडित महाड मनसे कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले आहे.
3 मे चा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता. जर तीन मे पर्यंत हे भोंगे हटले नाहीत तर चार तारखेला जिथे भोंग्यावर आजान होईल त्या मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आधीपासूनच पोलीस प्रशासनातर्फे पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. ४ तारखेच्या सकाळपासून सुरक्षेच्या कारणास्तव महाडमधील मनसे कार्यालयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावेळी मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.