विटभट्टीसाठी वीजचोरी बेतले जीवावर; एका मजुरांच्या मृत्यू, दोघे गंभीर.

 वर्धा :- आर्वी अवैधरित्या सुरू असलेल्या विट्टभट्टीवर घेतलेला अनधिकृत वीज प्रवाह काम कारणाऱ्या मजुरांच्या जिवावर बेतला. यात एका कामगाराचा मत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. भट्टीमालक येथील यंत्र चालविण्यासाठी चोरीची वीज वापरत असल्याचे पुढे आले आहे. एवढेच नाही तर ही वीटभट्टीही अवैध असल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती आहे.

दत्ता मारोती सिडाम वय 35, असे मृताचे नाव असून तो संजयनगर ये

 

थील रहिवासी आहे, तर गजानन व पठाण अशी जखमींचा नावे आहेत. बैरमबुवा परिसरातील बाबू हरेल यांच्या पडीक शेतात नरेश गाडगे हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून विटा काढण्याचे काम करीत आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी त्याने विटा थोपाईचे विद्युत यंत्र आणले. शेतालगत असलेल्या वर्धमनेरी केंद्राच्या लघुदाब विद्युत वाहिनीवरून त्याने या यंत्रासाठी चोरीचा वीजपुरवठा घेतला होता. यासाठी वापरत असलेला केबल ठिकठिकाणी तुटला असल्याने त्यातील एक तार यंत्राला चिपकली. त्यामुळे यंत्रामध्ये विद्युत प्रवाह संचारला आणि याचा झटका मशीनवर काम करीत असलेल्या कामगारांना बसला. दत्ता सिडाम व त्याच्यासोबत काम करणारे दूर फेकले गेले. यात दत्ता सिडामचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी असून दुसरा किरकोळ जखमी आहे.

याची माहिती मिळताच ठाणेदार संजय वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक ज्योत्सना गिरी, कृष्णा उईके, जयपाल मुंद्रे आदींनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे अभियंता निखिल दातीर, गणेश बर्वे, वर्धमनेरी केंद्राचे ललित शिंगारे, शैलेश चरडे हे घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी विद्युत केबल, मेन व विद्युत पुरवठा घेण्यासाठी वापरलेले इतर साहित्यसुद्धा जप्त केले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

अनेक वर्षांपासून विद्युत चोरी 
गेल्या अनेक वर्षांपासून वीटभट्टी मालक वर्धमनेरी केंद्राच्या लघुदाब वाहिनीवरून अवैधरीत्या वीजपुरवठा घेऊन मोठ्या प्रमाणात वीजचोरी करीत होता. मात्र, यापासून वीजवितरण विभागाचे कर्मचारी अनभिज्ञ होते, तर वीट कारखाना हा जंगल शिवारात असल्यामुळे याचा लाभ उचलत तो रात्रीच्या सुमारास वीजचोरी करीत होता.

विटभट्ट्यांच्या परवानगीचा मुद्दा ऐरणीवर 
हिवाळा येताच विटभट्ट्यांच्या कामांना प्रारंभ होतो. विटभट्ट्या लावण्यासाठी शासनाकडून परवाना घेणे अनिवार्य आहे. अशातच आर्वीत घडलेल्या या प्रकारामुळे सुरू होत असलेल्या भट्ट्यांची परवानगी तपासणे गरजेचे झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here