वरंध येथे श्री भैरवनाथ जत्रा उत्सव संपन्न
राकेश देशमुख
महाड शहर प्रतिनिधी
मो.७८८७८७९४४४
महाड करोना च्या महामारीमुले गेली दोन वर्ष श्री. भैरवनाथ जत्रा उत्सव करण्यात आला नव्हता परंतु २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने नियम शितील केल्याने शासनाच्या नियमानुसार श्री. भैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ०७/०५/२०२२ पासून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला. सकाळी शनिवार दि. ०७ मे २०२२ रोजी सकाळी ७ वाजता नित्यनियमाची पूजा करून सकाळी ८ वाजता अभिषेक, दुपारी ८ वाजता महाआरती, दुपारी ३ वाजता गोडाचे नैवेद्य, सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत पालखी सोहळा, ९ ते १२ वाजता गोंधळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ४ वाजता भव्य कुस्त्यांचा आखाड्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून मल्ले उपस्थित होते. या सर्व माल्ल्याचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाड च्या माजी नगराध्यक्ष स्नेहलताई जगताप, कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाना जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, सोमनाथ ओझर्डे, महाड MIDC साहाय्यक पोलिस निरिक्षक मारुती आंधळे साहेब, चेंतन कोंडे देशमुख,राकेश देशमुख आदी सर्व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या यात्रा उत्सव कार्यक्रमासाठी तात्यासाहेब देशमुख, शहाजी देशमुख, आर्यन देशमुख, धोंडीराम डोंबे, अविनाश देशमुख, सचिन देशमुख, गणेश देशमुख आदी यात्रा उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी मेहनत घेतली. रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाने श्री. भैरवनाथ उत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात अली.