महाड एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९/५/२०२२ रोजी मौजे राजेवाडी फाटा ईसार पेट्रोल पंप समोर नाकाबंदी करण्यात आली असता सकाळी ६:३० ते ७:०० वाजताच्या दरम्यान पिकप जीप क्रमांक एम एच ०८ एच ६५२८ ही गाडी खेड कडून महाडच्या दिशेने येत असताना नाका-बंदी दरम्यान थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी क्रमांक १) हनिफ अब्दुल गणी कोंडेकर वय ४२ वर्षे रा. पालघर मोहल्ला ता. मंडणगड जि. रत्नागिरी २) मोहम्मद बालमियाॅ चोगले वय ४५ रा. भोस्ते मोहल्ला ता. खेड जि.रत्नागिरी यांनी खबर देणार यांना अर्वाच्च भाषेत बोलून खबर देणार व साक्षीदार यांचे सरकारी कामात अडथळा केला त्यावेळी गाडीची झडती घेतली असता जनावरे बेकायदेशीर भरून पिकअप जीप वाहनातून वाहून नेण्यासाठी पुरेशी जागा नसताना देखील जनावरांना गाडीत दाटीवाटीने कोंबून घेऊन जात असताना पकडण्यात आले असता महाड midc पोलीसांनी जनावरे ताब्यात घेतल्यानंतर संबंधित जनावरांवर API आंधळे यांनी पशुवैद्यकीय डाॅक्टर यांना बोलावून प्राथमिक उपचार करण्यास सांगितले यामध्ये १,१२००० रुपये किंमतीची १० जनावरे व ५,००,००० रुपये किंमतीची गाडी आणि आरोपी यांना ताब्यात घेतले असून फिर्यादी सागर शशिकांत अष्टमकर पो.हवा.११२६ महाड एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून काॅ.गु.र.जि.नं ५८/२०२२ भा.द.वि.कलम ३५३,१८६,१८९,३४.सह प्राण्यांना निर्दयतेने वाढविण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ए),११(१)(डी),११(१)(इ),११(१)(एफ)सह मो.वा.का.क.१९८८ चे कलम १८३,१८४,३(१)१८१,२३,९/१७७,१४६/१७७,१ १५/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि श्री एम एस आंधळे करीत आहेत तसेच मा.उपविभागीय अधिकारी महाड श्री निलेश तांबे यांनी महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भेट देऊन कौतुक केले आहे