“अर्थसंकल्प” (बजेट) मार्गदर्शन कार्यक्रम रत्नागिरी येथे उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ९८६९८६०५३०
रत्नागिरी – भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ यांच्या वतीने पटवर्धन हायस्कूल हॉल रत्नागिरी येथे ”अर्थसंकल्प” (बजेट) या विषयावर मार्गदर्शन शिबिर विद्यार्थी व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात विचारमंचावरील सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रथम सत्र विषय (अर्थसंकल्प बजेट आणि सामान्य जनता) प्रमुख मार्गदर्शक मा_शुद्धोदन_आहेर_सर (सामाजिक कार्यकर्ता) द्वितीय सत्र विषय (भारतीय लोकशाही आणि नागरिकांची जबाबदारी ) मा.अमोलकुमार बोधिराज (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, भारतीय लोकसत्ताक संघटना ) अर्थसंकल्प (बजेट)कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून मा.राजेंद्र आयरे सर ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ) मा. मनिष जाधव (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ) यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमांसाठी संपूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून विद्यार्थी व कार्यकर्ते आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती.
तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.स्वप्नाली आखाडे मॅडम आणि आभार व्यक्त प्रदर्शन मा.प्रसेंजीत देवधेकर सर(रत्नागिरी जिलाध्यक्ष, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ) यांनी केले.आयोजक भारतीय लोकसत्ताक विध्यार्थी संघ जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला यशस्वीपणे जबाबदारीने करून दाखवले.यशस्वी होण्यासाठी सहभागी असलेले कार्यकर्ते प्रसेंजित देवधेकर, हर्षदा मोहिते, साक्षी चव्हाण, स्वप्नाली आखाडे, मिर्णाली सावंत,
साक्षी सावंत ,मनाली बांदकर तसेंच मुंबई वरून सहभागी झालेले कार्यकर्ते मनिष जाधव,दिपिका आग्रे,विशाल गायकवाड,अजय तायडे,सुप्रिया जाधव,पिलाजी कांबळे,ऍड रुपाली खळे,वैशाली कदम,सुषमा सावंत,,किरण गमरे,संदिप आग्रे,अभिषेक कासे,कमलेश मोहिते,श्रेयस जाधव,जय खळे,योगेश कांबळे,कल्पेश पवार,कविता धनवडे , सचिन कुलये,गुणवंत कांबळे उपस्थित होते.