नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविला आपल्या चिमुकलीचा जीव

नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविला आपल्या चिमुकलीचा जीव

नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून आईने वाचविला आपल्या चिमुकलीचा जीव

हेमा मेश्राम
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मो.न.9356653707

दुर्गापूर:- सविस्तर या प्रमाणे चंद्रपूर मधील दुर्गापूर येथे वॉर्ड न.मधील सरकारी दवाखाना आवारा जवळील आश्रम शाळा जवळ आरक्षा कोपूर्लावार वय 3 वर्ष हिचे घर आहे ती घरा जवळ खेळत असताना नरभक्षक बिबट्याने आरक्षा वर हल्ला करून तिला उचलून नेले ती जोरात रडत असल्याचं तिच्या आई च्या लक्षात येताच तिच्या आईने बिबट्याचा दिशेने धाव धरली व मदती साठी ओरडू लागली महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकताच लोक जमा झाली व बिबट्याच्या मागे धाव धरली.गर्दी व आरडा-ओरडा बघून बिबट्याने आरक्षाला सोडून जंगलाच्या दिशेने पडत गेला.आरक्षा ही जखमी असल्यामुळे तिला चंद्रपूर च्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले त्या चिमुकलीच्या गळ्याला व शरीराला जखमा झाल्यात परंतु त्या चिमुकलीचा जीव आज तिच्या आईच्या हिम्मती मूळे वाचला.
दुर्गापूर मद्ये 2 ते 3 महिन्या मद्ये ही पाचवी घटना आहे बिबट्याच्या हल्ल्यात राज,प्रतीक, गीता व 45 वर्षीय मेश्राम नामक इसमाला सुध्धा जीव गमवावा लागला व आज परत 3 वर्षीय मुलीवर नरभक्षक बिबट्याचा झालेला हल्ला बघून संपूर्ण दुर्गापूर नागरिक संतापले आहेत व संपूर्ण दुर्गापूर,wcl कॉलनी, उर्जनगर इथे भीतीचे वातावरण आहे.अश्या जंगली नरभक्षक प्राण्यांचे काहीतरी करावे अशे वनविभाग कडे नागरिकांची मागणी आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती पसरताच घटनास्थळी प्रशांत भारती व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येऊन भेट दिली.