जोगेश्वरीतील संजरी वेल्फेअर ट्रस्टतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण
पूनम पाटगावे जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी ८१४९७३४३८५
जोगेश्वरी (मुंबई) : – दिनांक ९ मे २०२२ रोजी शिवसेना नेते मा. श्री. खासदार गजानन कीर्तिकर साहेब यांच्यावतीने ईद-ए-मिलाद सणाचे औचित्य साधून जोगेश्वरीतील शिवसेना शाखा ७८ मधील बांद्रा प्लॉट विभागातील संजरी वेल्फेअर ट्रस्टला रुग्णवाहिका सेवा लोकार्पण करण्यात आली. संजरी वेल्फेअर ट्रस्ट हे गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे, त्यांना सेवा पुरवण्याचे काम करते. संजरी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून अशा गरजू लोकांना आणखी एक मदतीचा हात म्हणून शिवसेनेने २४/७ कालावधीसाठी रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदन मा. श्री. अनंत (बाळा) नर यांनी केले. कोणत्याही जातीधर्माचा भेद न मानता सर्वांना सहाय्य करूया, असे त्यांनी निवेदन करताना सांगितले. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये हॉस्पिटलची गरज ही कमी असावी यासाठी आपले शरीर आणि आरोग्य चांगले रहावे तसेच अडचणीच्यावेळी गरज पडेल तेव्हा ही शिवसेनेची रुग्णवाहिका उपयोगी पडेल , असे मा. श्री. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे विधान मा. श्री. बाळा नर यांनी निवेदन करताना सांगितले. संजरी वेल्फेअर ट्रस्टचे काम अतिशय कौतुकास्पद आहे.
संजरी वेल्फेअर ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पणच्या शुभप्रसंगी युवासेना नेते मा. श्री. अमोलजी कीर्तिकर, नगरसेवक मा. श्री. अनंत बाळा नर ,उपविभागप्रमुख श्री. जयवंत लाड, उपविभाग समन्वयक श्री. रवींद्र साळवी भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख श्री. नंदकुमार ताम्हणकर, श्री. नितेश म्हात्रे, संजरी ट्रस्ट अध्यक्ष श्री. हैदर खान, उपशाखाप्रमुख श्री. युसूफ दुलारे, उपशाखासंघटक सौ. परवीन भाभी, श्री. प्रकाश सावंत आणि श्री. आदित्य थेराडे तसेच सर्व स्थानिक मुस्लिम बांधव, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.