महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष श्री.डॉ.सतीश वैरागी साहेब यांचा ओबीसी जनजागृती व प्रसार मागणीसाठी कोकण दौरा
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
कोकण:-तेली समाजाला सामाजिक- आर्थिक-सांस्कृतिक जागृत करणे महत्त्वाचे आहे आणि हे करण्याकरिता ओबीसी चळवळ म्हणून एक तत्त्वज्ञान निर्माण करणे ओबीसी उद्दिष्ट व पर्यायी सांस्कृतिक राजकारण आणि सोबतच पर्यायी साहित्य,कला,शिक्षण यावर मार्गदर्शन वैरागी साहेब यांनी केले या कार्यक्रमात आपल्या परिवारासह कोकणामध्ये उपस्थित होते चीपळूण, गुहागर,रत्नागिरी,गणपतीपुळे,देवगड, राजापूर,कुणकेश्वर येथे सभा घेऊन ओबीसींचे महत्त्व सांगितले व आरक्षणाचा हक्क रद्द केला गेला तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही कोकणातील सर्व संस्थांनी वैरागी साहेब व त्यांच्या परिवाराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले