पुसनद ते सारंगखेडा रस्त्यावरील काटेरी झुडपे तोडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
राहुल आगळे
शहादा प्रतिनिधी
१२ मे, शहादा: शहादा तालुक्यातील सारंगखेडा ते पुसनद या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील काटेरी झुडपे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने शेतकऱ्यांना या रस्त्यावरून ये -जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
हा रस्ता पुसनद गावाला जाण्यासाठी शाॅटकट असल्याने वाहनधारक या रस्त्यांचा वापर करतात मात्र रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहनं दिसत नसल्याने अपघाताची स्थिती निर्माण होते आहे.
केळी, पपई, वाहतूक करणारी मोठी वाहने मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी शेतकरी व वाहतूक करणाऱ्या लोकांना व वाहनचालकांना रस्त्याची दुरवस्था मोठें मोठें खड्डे असल्यामुळे कसरत करावी लागत आहे.काटेरी झुडपे व रस्त्यांची दुरवस्था यामुळे शेतकरी शेतमाल वाहतूक करणाऱ्यां वाहनांचां अपघात झाल्यास होऊन शेतमालाचे नुकसान व शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.संबंधित ठेकेदाराने एकाच बाजूची झुडपेही तोडले असुन दुसऱ्या बाजूची झुडपेही तोडुन रस्त्याच्या साईड पट्टायांची आणि खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनसह वाहन धारकांनी केली आहे.