वर्ध्यातील ठाणेदारावर ब्रम्हपुरी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वर्ध्यातील वडणेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटेवर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात 15 वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील एका महिलेशी ओळख पटली.ओळखी रूपांतर प्रेमात झाले…प्रेमविवाह करण्याचे पीडितेला आमिष दाखवून संबंध प्रस्थापित करायचा.राजेंद्र शेटे हे अनेक ठाण्यात कार्यरत होते. याच दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून महिलेवर अत्याचार केला.असे फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.पीडित महिलेने लग्नाची गळ घालत असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे हे आपल्या पदाची दादागिरी दाखवत पीडितेला मारहाण करायचा. यातच आरोपी राजेंद्र शेटे याने पीडित महिलेला 30 मार्च 2022 ला नागभीड तालुक्यातील घोडझरी येथे भेटायला बोलावले होते.दरम्यान पीडित महिलेने लग्नाबद्दल विचारले असता तिच्याशी भांडण करून आरोपी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे ह्याने मारहाण केली.त्यामुळे पीडित महिलेने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांना अटक करण्यात आली नाही.