मुंबई-गोवा महामार्गाचे “काम” नेहमीच वाहतूक जाम-वाहतूक पोलीसांचा निघतोय घाम
महाड ते नांगलवाडी फाटा दरम्यान नागरिकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):- मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली कित्येक वर्षे संथगतीने चालू असून अपघातात अनेकांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे यासंदर्भात मा.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची घोषणा केली होती अशातच पावसाळा तोंडावरती आला असताना सुद्धा काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नाही एकंदरीत लोकप्रतिनिधी व प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करताना दिसत आहेत कोणालाही गांभीर्य राहिलेले नाही सर्व्हिस रोड, गटारे, साइट पट्टी, रोड लगतचे डोंगर अशा प्रकारची अनेक कामे अपूर्ण असून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा अपघातांची मालिका सुरूच राहणार यामुळे कित्येक निष्पाप नागरिकांना प्राणाची आहुती द्यावी लागणार असून आता तरी प्रशासनाने जागे होऊन त्वरित उपाययोजना कराव्यात किंवा कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी अशा प्रकारची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे