नागरिकांनो व्हा सावध ग्राहकांच्या पोटात मुदतबाह्य बिअर विक्रीला
राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
मीडिया वार्ता न्यूज
चंद्रपूर : – शहरातील जटपुरा गेट जवळील बिअर शॉपी येथे मुदतबाह्य बिअरची जोमात विक्री करण्यात येत आहे.याकडे उत्पादन शुल्क विभागाच व पोलिसांचे दुर्लक्ष असून व्यसनी नागरिकांच्या आरोग्याशी जिवघेणा खेळ सुरु आहे. शहरातील अतिशय गजबजलेल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सपना टॉकिज जवळील बिअर शॉपी येथे मुदतबाह्य बिअरचा माल सर्रासपणे विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून भविष्यात लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणाची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असून सोबतच त्यांच्या आरोग्याशीही खेळ होत आहे.शहरात मद्य दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जाण्यायेण्याचा रस्ता,
वाहनतळाची सोय, परिसरातील नागरिकांना होणारा त्रास आदी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपला व्यवसाय थाटला आहे. परवाना नसतांना बिअर शॉपी येथे मद्यपी जागेवरच त्यांचे पिण्याचे कार्यक्रम आटोपत आहेत. उघड्यावरच बिअरचे घोट घेणे सुरु आहे. बारमधून मुदतबाह्य दारूची विक्री सुध्दा करण्यात येत आहे. बिलाची मागणी केल्यास व मुदतबाह्य बिअर विक्रि संबंधी विक्रेत्याला ग्राहकाने जाब विचारल्यास उलट उत्तर देऊन व शिवीगाळ करून आपला मनमानी अवैध व्यापार निर्भिडपणे चालवत आहेत. यासंबंधान संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली असता त्यांचेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे.