श्रीवर्धन आगारातील बस चा साखरवणे गावाजवळ अपघात

श्रीवर्धन आगारातील बस चा साखरवणे गावाजवळ अपघात

श्रीवर्धन आगारातील बस चा साखरवणे गावाजवळ अपघात

✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱

श्रीवर्धन :-आज दिनांक १६ मे २०२२रोजी सकाळी ११ वाजता श्रीवर्धन आगरामधुन निघालेली कोलमांडला श्रीवर्धन गाडी नं – MH १४ BT २७३८ सकाळी साखरवणे फाट्या जवळ अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार साखरवणे गावा जवळील एका वळणावर समोरून येणाप्या गाडीला वाचवण्यासाठी बस चालक श्री.महादेव पंढरी खंडागीरी याने आपली बस रस्त्याच्या कडेला उतरवली. मात्र अरुंद रस्त्यामुळे गाडीचा पुढचा चाक रस्त्याखाली उतरल्याने गाडी पलटि झाली. गाडीमध्ये एकुण २० प्रवासी प्रवास करत होते.
अपघाताची बातमी समजताच स्थानिक लोकांनी मदत कार्य सुरू केले. तसेच श्रीवर्धन पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक श्री. प्रशांत स्वामी साहेब व श्रीवर्धन चे तहसीलदार श्री. सचिन गोसावी. साहेब हे घटना स्थळी हजर होऊन मदत कार्य सुरू केले. व उपचारासाठी तातडीने श्रीवर्धन कुटिर रुग्यालयात भरती केले जखमी प्रवास्यानवर उपचार चालू आहेत. तरी सर्व प्रवासी बरे असल्याची माहिती मिळते.