…अन महिनाभरानंतर ” त्याचा ” मृतदेहच सापडला; हत्या की आत्महत्या ?
गोंडपिपरी तालुक्यातील घटना बेपत्ता असलेल्या यूवकाचा मृतदेह चिंवडा जंगलात
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी : महीणाभरापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह चिवंडा जंगलात आढळून आला. शिवा विठू आत्राम ( वय 45 ) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहीतीनुसार, जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चीवंडा या गावातील शिवा विठू आत्राम हा इसम 16 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घरातून निघून गेला. कुटूंबियांनी शिवा आत्राम याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेला महिना लोटून गेला. अश्यात आज जंगलात तेंदू संकलनासाठी गावकरी गेले असता त्यांना दुर्गंधी आली. मानवी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गावकर्यांना दिसला. गावकर्यांनी याची माहीती धाबा उप पोलिस स्टेशनला दिली.
ठाणेदार सुशील धोकटे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर मृतदेह बेपत्ता असलेल्या शिवा आत्राम याचा असल्याची ओळख पटली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या ? याचा तपास पोलीस करीत आहेत.