चंद्रपूर- नागपूर महामार्गावर भरधाव ट्रक आणि गाडीचा अपघात, तीन गाड्यांचा चुराडा.

वरोरा:- अंडी घेऊन हैदराबाद मार्गे नागपूरकडे येत असलेला एक ट्रक भरधाव वेगात उलटल्याने तीन चारचाकी वाहनांचा चुराडा झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात मांगली गावाजवळ घडली.

ट्रक तेलंगणातून नागपूरकडे निघाला होता. मात्र भरधाव वेगात महामार्गावर असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक शेजारून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला. यात तीन चारचाकी वाहनांची मोठी मोडतोड झाली असून एक वाहन ट्रक खाली दबले आहे.

दरम्यान या घटनेतील दोन जण जखमी असून त्यांना वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी महामार्ग व वरोरा पोलिसांनी पोचत अपघातातील जखमी व प्रवाशांची मदत केली. अधिक तपास वरोरा पोलीस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here