शहरातील बस स्थानक गेटवर उष्माघाताने युवकाचा मृत्यू
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
सिंदेवाही – सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकातील बस स्थानक गेट जवळ उष्माघाताने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी 2:30 चा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव प्रल्हाद वसंता आत्राम वय – 42 राहणार भुज तालुका ब्रह्मपुरी असे मृताचे नावआहे. आपल्या व्ययक्तीक कामाकरता सिंदेवाही शहरामध्ये आला असता तो दुपारच्या सुमारास शहरातील बस स्थानक गेटवर मृतावस्थेत आढळून आला . बघणाऱ्या नागरिकांनी लगेचच याची माहिती जवळील पोलीस स्टेशनला दीली असून. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
याचा पुढील तपास ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI ढोके हे करीत आहेत.सविस्तर बातमी लवकरच मिडिया वार्ता न्युज वर