आई वडिलाची सेवा मनापासुन करा जिवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. –ह.भ.प.स्वप्निल महाराज पवार
संतोष आमले
पनवेल तालुका प्रतिनिधी
9220403509
पनवेल : – आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच घराला घरपण घरपण असतं त्यामुळं मनापासून आईवडिलांची सेवा करा तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुमच्या जिवनाचे सार्थक होईल असे प्रतिपादन स्वप्नील महाराज पवार यांनी केले .
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील कै. चंद्रभागा वामन ओव्हाळ व कै. रमेश कोंडीबा ओव्हाळ व कै. मोहन गवळी यांचा तिघांचा दशक्रिया विधी एकत्रीत अंभोरा येथील स्मशानभुमीत करण्यात आला यां दशक्रिया विधी निमित्त झी टॉकीज फेम ह.भ.प. स्वप्नील महाराज पवार बोलताना म्हणाले की आई-वडील मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात. मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे यांसाठी ते प्रयत्न करतात; परंतु काही मुले आई-वडिलांना उलट बोलतात. त्यामुळे आई-वडिलांचे मन दुखावले जाते. मुलांच्या उलट बोलण्यामुळे आई-वडील दुखावले गेले, तर ते देवालाच दुखावल्यासारखे होते. मुलांनो, हे टाळण्यासाठी आई-वडिलांशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ रहावे.
आपल्या घरातील म्हातारे आई वडील सुखी असतील तरच घराचं घरपण टिकून राहतं .जे कोणी समाजामध्ये आईवडिलांची सेवा मनापासून करतात त्यांना आयुष्यात कुठे काही कमी पडत नाही .त्यामुळे ते गेल्यानंतर दशक्रिया विधी व पुण्यतिथीला खर्च करण्यापेक्षा ते जिवंत असेपर्यंतच त्यांना सुखाने खाऊ घातलं तरच खरं पुण्य मिळतं .प्रत्येक आईवडील स्वत: चंदनाप्रमाणे झिजवून आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी धडपडत असतात .समाजातील अन्य अंधश्रद्धा रूढी परंपरांवर त्यांनी कडाडून टीका केली .नुसता भंपकपणा असून चालत नाही तर माणसांनी कृतीतून ते केलं पाहिजे .मोठ्या मोठ्या समारंभामध्ये आईवडलांचे महती सांगायची आणि घरी आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायचं असं समाजात घडता कामा नये .मी स्वतः माझ्या आईची सेवा मनापासून करतो त्यामुळे मला समाजाला सांगण्याचा अधिकार असे असे ठामपणे त्यांनी प्रवचनामध्ये सांगितले .
दशक्रिया विधी का करायचा याचाही महत्त्व त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले .आईचे महत्त्व सांगत असताना त्यांनी सांगितले की आई गेल्यानंतर लेकीचा माहेराचा आधार तुटतो तिला माहेर सुनंसुनं वाटतं .तसंच समाजामध्ये खरं पाहिलं तर मुलांपेक्षा .मुलीची माया आईवर जास्त असते .म्हणून तुमच्या घरात आनंद टिकवून ठेवायचं असेल आपल्या घरातील आई वडीलच सुखी असले कपाहिजेत .आपल्या वृध्द मातापित्यांचा सांभाळ मनापासून करा आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंतच आपल्या घराचं घरपण टिकून राहतं असे प्रतिपादन ह. भ.प. स्वप्नील महाज पवार यांनी केले आहे.