अल्पवयीन मुलीवर लेंगीक अत्याचार प्रकरणी शिक्षकाला आजन्म शिक्षा
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी रायगड
८०८००९२३०१
माणगांव : – माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सण २०१६ ते दिनांक १७/७/२०१९च्या दरम्यान रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा फलांनी ता माणगांव येतील जुन्या इमारतीच्या खोलीत दोन अल्पवयीन मुलीवर अननेतीक लेंगीक अत्याचाराने अमानुष कृत्य करणाऱ्या नित्यानंद धोंडू पाटील या नराधमांस अखेर आजन्म मरेपर्यंत शिक्षा सुनावली आहे.जिल्हा न्यायालिशचा हा ऐतिहाशिक निर्णय असून अशा प्रकारे निच्य कृत्य करणाऱ्या नराधमास आजन्म शिक्षा सुनावनेचा असे निच्यकृत्य करणाऱ्याला माफी नाही हे सिद्ध केले.
सदर घटनेची माहिती अशी की या गुन्ह्यातील फिर्यादी याची पीडित मुलगी व तिची लहानपनापासूनची मैत्रीण या इयत्ता पहिली पासून रा जि प मराठी शाळा फलाई या शिक्षण घेत होत्या. त्याचा हा अज्ञात गैरफायदा घेऊन पीडित मुलींवर त्यांनी जबरदस्तीने वारवार लेंगीक अत्याचार व अनेतिक अत्याचार करून त्यांना धमाकी दिली जर हा प्रकार जर कोणाला सांगितलं तर मी तुम्हाला मारून टाकेन अशी दमदाटी करून धमकी दिली.
सविस्तर वृत्त असं की वरील घटनेची फिर्याद गोरेगाव पोलिसांनी भा द वि कलम ३७६(२)(एफ )(आय )(एन )३७६(सी )(बी )३७६ (एबी) ३७७,५०६ व पोस्को अंतर्गत कायदा कलम ४,६,८ तसेच अ जा ज का क १(१)(डब्लू )(ळ ळ ळ )३,२,७ अन्वये गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा अधिक तपास शशिकिरण काशीद,पोलीस, उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव,यांनी केला आहे.व सदरचे दोषारोप पत्र मा जिल्हा व सत्र न्यायालय माणगांव येते दाखल केला आहे.
सदर केसच्या सुनावणी दरम्यान पेरवी अधिकारी उदय धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक, सौ छाया कोपणर मपोह, शशिकत कासार पोह, शशिकत गोविलकर पोह, सुनील गोळे पोशी, यांनी सहकार्य केले सदर साक्षीदाराची साक्ष व न्यायनिर्णयचा आधारे मा. विशेष व सत्र न्यायाधीश श्रीमती पी. पी बनकर माणगांव रायगड यांनी घटनेतील गुह्याच्या शाबाती नंतर आरोपी नित्यानंद धोंडू पाटील यास दिनाक १९/५/२०२२ रोजो दोषी ठरवून आजन्म कारावास मरेपर्यंत सक्त्तमजुरी व रुपये एक लाख पन्नास हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.