पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे महागाईची अंत्ययात्रा…. तिरडीवर गॅस सिलेंडर व लोट गाडीवर मोटार सायकल रॅली ने वेधले लक्ष…..

पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे महागाईची अंत्ययात्रा….

तिरडीवर गॅस सिलेंडर व लोट गाडीवर मोटार सायकल रॅली ने वेधले लक्ष…..

पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे महागाईची अंत्ययात्रा.... तिरडीवर गॅस सिलेंडर व लोट गाडीवर मोटार सायकल रॅली ने वेधले लक्ष.....

ईसा तडवी
मिडिया वार्ता प्रतिनिधी
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अच्छे दिनचा जूमला देत या देशाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारच निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना,अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने आज पाचोऱ्यात महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई ची अंत्ययात्रा हि पाचोरा शिवसेना कार्यालयापासून ते छञपती शिवाजी महाराज चौकात प्रेतास विसावा देण्यात आला. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते गांधी चौक जामनेर रोड ने पाचोरा तहसिल आवारात अंत्ययात्रा संपविण्यात आली.यावेळी महिलांनी चुल पेटवित केंद्र सरकारने केलेल्या भयंकर महागाई चा निषेध केला.यावेळी महिलांनी अंत्ययात्रा च्या प्रेत जवळ अक्रोश व्यक्त करुन महागाई चा निषेध केला. याप्रसंगी पाचोरा नायब तहसीलदार संभाजी पाटील यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पाचोरा – भडगाव विधानसभा चे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारावकर,युवा सेनेचे सुमित पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अभय पाटील, मुकुंद बिल्दीकर, शरद पाटे, पदमसिंग पाटील, गजु पाटील, जितेंद्र जैन, आदींसह मोठय़ा संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोटार सायकल व हंडीच्या प्रेत यात्रेने वेधले लक्ष…

पाचोर्‍यात शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या महागाईच्या विरोधात अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती. पाचोरा शहरात आज २१ मे रोजी शिवसेने तर्फे अंत्ययात्रा काढण्यात आली शिवसेना पाचोरा – भडगाव विधानसभा चे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात मोर्चा व अंत्य यात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महागाई कमी व्हावी अशी मागणी करण्यात आली. या अंत्ययात्रेत तिरडीवर गॅस सिलेंडर ठेवण्यात आला होता व लोट गाडीवर मोटरसायकल उभी करून पेट्रोल वाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी तिरडीवर गॅस सिलेंडर व लोट गाडीवर मोटार सायकल उभी केलेली सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.