वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दुपट्टा देऊन केले पक्षात स्वागत.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दुपट्टा देऊन केले पक्षात स्वागत.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दुपट्टा देऊन केले पक्षात स्वागत.

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- भारताचे पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांनी आपल्या पदाचा व पक्षाचा त्याग करत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तरारे म्ह्नाले जिल्हाध्यक्ष म्हणून आपण वंचित बहुजन आघाडीची धेय्य, धोरणे चांगल्या रीतीने राबविले मात्र तिथे नेहमी अन्याय होत असल्याचे मला दिसले. पक्षाची स्थापना बहुजनांच्या कल्याणसाठी आहे असे वाटले परंतु हा पक्ष नेहमीच भाजप ची बी टीम म्हणून काम करत असल्याचे दिसले. सोबतच पक्षात अंतर्गत राजकारण मोठ्या संख्येने आहे. वंचित कडून नेहमी ओबीसी समाजाचा वापर करून अंतर्गत राजकारण साकारले जाते. हे तत्व माझ्या व्यक्तीक जीवनात बसत नसल्याने मी या पक्षाचा व जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दुर्योधन तरारे यांना वंचित ची विचारधारा जनसामान्यांसाठी अहितकारी वाटल्याने त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला आहे त्या बद्दल त्यांचे हार्दिक स्वागत आहे. येनाऱ्या काळात अनेक वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील कॉंग्रेस पक्ष्यात प्रवेश करतील असा विश्वास जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष सतिश विधाते, जिल्हा महासचिव समशेरखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, संयम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनु.जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, राकेश रत्नावार, महासचिव घनश्याम वाढई, सदाशिव कोडापे, रुपचंद उंदिरवाडे, हरबाजी मोरे, मुरलीधर मंग, सुभाष धाईत, बाबुराव गडसूलवार, अब्दुल पंजवाणी, अविनाश बांबोळे, आशिष कामडी, जावेद खान, रवी सहारे, भास्कर बांबोळे, सुधीर बांबोळे, समया पशूला , जितेंद्र मूनघाटे, वसंत राऊत, भय्याजी मुद्दमवार, तौफिक शेख, कल्पना नंदेशवर,आशा मेश्राम, विद्या कांबळे, मयुर गावतुरे सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी मिळून दुर्योधन तरारे यांचा काँग्रेस पक्षाच्या स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here