स्वराज्य फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात ४८०० लोकांची नेत्र तपासणी

स्वराज्य फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात ४८०० लोकांची नेत्र तपासणी

स्वराज्य फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात ४८०० लोकांची नेत्र तपासणी

📰मीडिया वार्ता न्यूज📰
पोलादपूर प्रतिनिधी – संदिप जाबडे
भ्रमणध्वनी – ८१४९०४२२६७

दिनांक – २१ मे २०२२
पोलादपूर(रायगड)- स्वराज्य फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र ही संस्था जनहितार्थ अनेक उपक्रम राबवित आली आहे. १० मे १६ मे या कालावधीत देखील संस्थेमार्फत रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव तालुक्यात नेत्र तपासणी शिबिर राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लोणेरे, माणगाव, गोरेगाव, खांडपाले, वडपाले, टेमपाले, आकले, आकले कोंड, भोराव या गावांमध्ये शिबिर राबवून ४८०० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

यातील २२३८ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मुंबई आय क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथे नेण्यात येणार आहे. या पूर्वी देखील पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात शिबिर राबवून संबंधित रुग्णांना मुंबई आय क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथे नेऊन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

फार कमी कालावधीमध्ये स्वराज्य फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र या संस्थेने समाजकार्याचा बेडा उचलला असून संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहेत. संस्थेमध्ये असणारी कार्यकारिणी ही ३० वर्षापेक्षा कमी असल्याने अधिक तरुणांनी समाजकार्यासाठी तत्पर राहण्याचे आव्हान देखील संस्थेकडून केले जात आहे.

संस्थेने दाखवलेल्या या कर्तव्य दक्षतेमुळे महाड आणि माणगाव तालुक्यातील शिबिरार्थिनी संस्थेचे आभार मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थापक अनिकेत तांबे, उपाध्यक्ष साहिल पाटेकर, कोषाध्यक्ष श्रद्धा घाडगे, सचिव माया साबळे, सहसचिव ऋषिकेश तांबे, योजना लोखंडे वर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.