कुडपन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार - पालकमंत्री आदिती तटकरे

कुडपन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार – पालकमंत्री आदिती तटकरे

कुडपन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार - पालकमंत्री आदिती तटकरे

📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻 संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
भ्रमणध्वनी -८१४९०४२२६७

दिनांक – २१ मे २०२२
पोलादपूर(रायगड)- संपूर्ण महाराष्ट्रात मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या कुडपण खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावातील पर्यटन स्थळाला पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी दोन्ही पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत आजपर्यंत जसा इतिहास जपून ठेवला आहे तसाच इतिहास भविष्यात जपला जाईल असा विश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कुडपण येथे बोलताना व्यक्त केला.

यावेळी बोलताना नामदार तटकरे यांनी छत्रपती शिवरायांनी राजधानी म्हणून घोषित केलेल्या रायगड मध्ये जन्माला आल्याचा अभिमान असल्याचे यावेळी सांगितले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपये मंजूर केले आहे. तर १.५० कोटी रुपये कुडपण पर्यटन क्षेत्राच्या विकास कामासाठी मंजूर केले असल्याचे सांगितले.

भविष्यात कुडपणसाठी विविध योजनांद्वारे पर्यटन विकासाची दालने खुली करण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.कुडपण खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावात जलजीवन मिशन अंतर्गत ४५ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सांगितले. प्रादेशिक पर्यटन अंतर्गत कुडपन येथील रस्त्यालगत संरक्षण भिंत, कालकाई मंदिर पर्यंतचा रस्ता मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच चंद्रगड, कांगोरिगड चा विकास रायगड च्या धर्तीवर पुरातत्व विभागा कडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तसेच भारतातील पहिले महावीर चक्र प्राप्त नाईक कृष्णाजी सोनावणे यांच्या समाधी स्थळाकडे जाणार रस्ता व त्याच्या आजूबाजूचा परिसराच्या विकासासाठी कट्टीबद्घ राहणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी माझी जिल्हा परिषद अध्यक्षा अपेक्षा कारेकर, विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानविलकर, तालुका अध्यक्ष सुहास मोरे, शहर अध्यक्ष अजित खेडेकर,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महम्मद मुजावर, तहसीलदार दीप्ती देसाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, तलाठी लीना गुरव, सामाजिक बांधकाम विभागाचे सुर्वे, कुडपन सरपंच सौ. शेलार, रामदास कळंबे, नितेश शेलार, कुडपन ग्रामस्थ, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here