वाघाच्या हल्यात पत्नी ठार तर पती बेपत्ता चिमुर तालुक्यातील केवाडा-गोंदेडा शेतशीवारातील घटना.

वाघाच्या हल्यात पत्नी ठार तर पती बेपत्ता

चिमुर तालुक्यातील केवाडा-गोंदेडा शेतशीवारातील घटना.

वाघाच्या हल्यात पत्नी ठार तर पती बेपत्ता चिमुर तालुक्यातील केवाडा-गोंदेडा शेतशीवारातील घटना.

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो. 8830857351

चिमूर : – चिमुर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जांभुळकर व पत्नी मीना जांभुळकर (45) हे मंगळवार, 24 मे रोजी दोघेही सकाळच्या सुमारास केवाडा-गोदेडा वनपरिसरात तेंदुपत्ता तोडन्याकरीता गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने दोघांवरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे . या हल्ल्यात पत्नी मीना हिचा जागेवरच मृत्यू झाला असून पती विकास जखमी अवस्थेत जंगलात भरकटले. विकास यांची गावकरी व वनवीभागामार्फत जंगल परीसरात शोधमोहिम सुरू आहे. पत्नी मीनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पती पत्नी केवाडा गावचे रहीवासी आहेत. तेंदूपान हंगाम सुरू असल्यामुळे व त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून पोटाची खळगी भरण्यासाठी वनमजूर आपला जीव धोक्यात घालून जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जातात. या घटनेमुळे जांभूळकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हिंस्रप्राण्यांच्या मानवावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे वनविभागाच्या कार्यकारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जंगलालगत असलेल्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने त्वरित लक्ष घालून व योग्य उपाययोजना करुन अश्या घटनांना आळा घालावा ही मागणी केवाडा गावातील नागरिकांमार्फत होत आहे.
==============

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here