भाजयुमो तालुका नागभीड च्या वतीने महाविकास सरकार विरोधात निषेध आंदोलन

भाजयुमो तालुका नागभीड च्या वतीने महाविकास सरकार विरोधात निषेध आंदोलन

भाजयुमो तालुका नागभीड च्या वतीने महाविकास सरकार विरोधात निषेध आंदोलन

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—सामान्य जनतेला महागाईत दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सलग दोनदा पेट्रोल व डिझेल वरील टॅक्स कमी केला. परंतु महविकास आघाडी सरकार स्वतः टॅक्स कमी करून जनसामान्यांना दिलासा न देता उलट केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या प्रवृत्तीचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यांसह भाजयुमो तालुका नागभीड च्या वतीने मा.बंटिभाऊ भांगडिया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनात पेट्रोल व डिझेल वरील टॅक्स कमी करण्यासाठी राज्य सरकार विरोधात नागभिड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. व पेट्रोल व डिझेल चे दर लवकर कमी न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमो तालुका अध्यक्ष देवानंद बावनकर यांनी दिला.
सदर आंदोलनात यशस्वी करण्यास प्रमुख म्हणून देवानंद बावनकर अध्यक्ष भाजयुमो,सचिन आकुलवार बांधकाम सभापती,शिरीष वानखेडे नगरसेवक,सुनील शिवणकर तालुका महामंत्री,अरविंद भुते जी.प.प्रमूख,आनंद कोरे सरपंच मेंढा,हेमंत नन्नावरे भाजयुमो शहर अध्यक्ष,नितेश कुर्झेकर,प्रमोद डबले, अमोल देशमुख,रोशन रामटेके,रोशन वाघमारे,हेमराज ठाकरे,सचिन चीलबुले,राजू पिसे,राकेश बावणे, राकेश मारबते,टेनिग्रेग मसराम,योगेश कामडी,हर्षद येरने,सौरभ सूर्यवंशी,विनोद मेश्राम,प्रमोद चौधरी,सचिन बुरबांधे,मुकेश धनिवार व अन्य कार्यकर्ते यांची प्रमूख उपस्थिती होती.