सातगाव येथील प्रा. श्रावण तडवी यांना पीएचडी प्रदान

सातगाव येथील प्रा. श्रावण तडवी यांना पीएचडी प्रदान

सातगाव येथील प्रा. श्रावण तडवी यांना पीएचडी प्रदान

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602

पाचोरा प्रतिनिधी : – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एम.एम. महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. श्रावण बाबुलाल तडवी यांना जळगाव विद्यापीठात दीक्षांत समारंभात नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.

डॉ. तडवी यांनी आदिवासी समाजात आदर्श निर्माण केला आहे. सातगावात लोकांच्या शेतावर आई सोबत त्यांनी कष्टमय जीवन जगत शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवून यश संपादन केले. पाचोरा महाविद्यालयात प्रा. म्हणून नोकरी मिळवली. ते सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेचे विद्यार्थी आहे. या यशाबद्दल PTC अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजयजी वाघ, मानदसचिव अॅड. महेश देशमुख, उपाध्यक्ष व्ही.टी.जोशी, स्थानिक चेअरमन प्रा.भागवत महालपूरे, सातगाव शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे, मुख्याध्यापक राहुल पाटील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.