मुंबई  – ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न बाळगण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक परमेश्वर कदम यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

मुंबई महापालिकेत सन २००७ ते २०१२ या कालावधीत नगरसेवकपदी असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून माया गोळा करण्याच्या आरोपावरून कदम यांना अटक करण्यात आली आहे.

वॉर्ड क्रमांक १२८चे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कदम यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचा एक अर्ज एसीबीकडे आला होता. त्यावरून चौकशी केली असता त्यांनी ६४.१७ टक्के इतकी जास्त रक्कम गोळा केल्याचे चौकशीत आढळले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी त्यांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here