मजबुरीचा फायदा घेत लग्न लावून वरपक्षाला लुबाडण्याऱ्या चांडाळ चौकडी कडून मुद्देमाल मिळवण्यात पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन ला आले यश.
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा:- दिनांक ०६/०५/२०२२ रोजी फिर्यादी चेतन विलास चौधरी रा. संजय नगर पिंपळगाव हरे यांनी पिंपळगाव हरे पो स्टे येथे फिर्याद दील्यावरुन गुरनं ११२/२०२२ भादवि कलम ४१७,४१९,४२०,३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी १) सुरेश पुर्ण नाव माहीत नाही २) कलीता पुर्ण नाव माहीत नाही (३) हापसिंग पुर्ण नाव माहीत नाही आरोपी क्र १ व २ राहणार मध्यप्रदेश व आरोपी क्र ३ ता. शिरपुर जि. धुळे यांना ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेद्र वाघमारे यांचे आदेशान्वये पो ना २५७२ रविद्रसिंग पाटील यांच्या कडेस देण्यात आला होता मा. डॉ प्रविन मुडे सो. पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री रमेश चोपडे अपर अधिक्षक सो चाळीसगाव परीमंडळ मा श्री भारत काकडे उप विभागीय पोलीस अधिकारी सो पाचोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करुन सदर आरोपीच्या शोध कामी पो नाईक २५७२ रविद्रसिंग पाटील, पो कॉ ४७६ पंकज सोनवणे, म पो कॉ /१४७ योगीता चौधरी अशाचे पथक तयार करुन दि १७/०५/२०२२ रोजी आरोपीच्या शोध कामी रवाना करण्यात आले त्यानी आरोपी हापसिंग यांचे गावी जावुन त्यास गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेवून आरोपी सुरेश यांचे शोध कामी मध्यप्रदेश मधील सेंधवा तालुक्यातील आरोपी सुरेश यांच्या गावी जावुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व त्यास आरोपी कलीता हीचे बाबत विचारुन ती खरगोन येथे असल्याबाबत कळविल्या वरुन खरगोन गावी जावुन आरोपी कलीता हीस पिंपळगाव हरे येथुन पळवुन घेवुन जाणारा अनिल याला ताब्यात घेवून पो स्टे ला आणले दि १९/०५/२०२२ रोजी आरोपी मजकुर याना अटक करण्यात आली असुन अटक मुदतीत त्याना त्याचे नाव गाव विचारता त्यानी त्याचे नाव १) सुरेश उर्फ मिस्त्रीलाल सुलभा आर्य रा. सोनवल ता सेंधवा जि बडवानी २)हापसिंग उर्फ आपसिंग शीकाऱ्या पावरा रा हेद्र्यापाडा ता शिरपुर जि धुळे ३) कलीता उर्फ लक्ष्मी कीसन कीराडे रा मोहमांडळी ता. जि खरगोन मध्यप्रदेश ४) अनिल विश्राम धास्ट रा रा मोहमांडळी ता. जि खरगोन मध्यप्रदेश असे सांगीतले त्याना कोर्टात हजर केले असता मा. न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी दीले असता पोलीस कस्टडी रीमांड मध्ये त्यानी त्याच्या घरी ठेवलेली फसवणुकीचा रक्कम १,२६,००० /- रु व आरोपी क्र ३ हीने चोरुन नेलेले राख रुपये पैकी ६,०००/- रु व तीला लग्नात दिलेले ७,५००/- रु चे सोन्या चांदीचे दागीने असे काढुन दीले आहे.