आपटा कोळीवाडा येथे मोफत ई- श्रमकार्ड आणि रिअल फ्रुट ज्यूस व ग्लुकॉनडी वाटपाचा कार्यक्रम झाला मोठया उत्साहात संपन्न !…
विठ्ठल ममताबादे
उरण तालुका प्रतिनिधी
उरण :-जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितमदादा म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या सहकार्यातुन कष्टकरी गरीब गरजूवंत स्त्री पुरुष श्रमसेवा करणारे असंघटित कामगार आणि उपजीविकेचे कोणतेही मुख्य साधन नसणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी मोफत ई -श्रमकार्ड काढून देण्याचं एक अनमोल आदर्शवत कार्य करण्यात आले.आणि फक्त ई.श्रमकार्डची नोंदणीच नाही केली तर चांगल्या प्रतीचे स्मार्ट कार्ड (ई- श्रमकार्ड) बनवून देण्यात आले आणि त्या मोफत ई- श्रमकार्डचं वाटप घेरावाडी,रामाचीवाडी,टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना व पनवेल आपटा कोळीवाड्यातील कोळी बांधवांना आपटा कोळीवड्यातील श्री गणेश मंदिरात करण्यात आले. श्री समर्थकृपा सखी स्वयंसाहाय्यताच्या संस्थापक अध्यक्षा संगिताताई ढेरे यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमा करिता उपस्थित असलेल्या घेरावाडी, रामाचीवाडी,टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना आणि आपटा कोळीवड्यात कोळी बांधवांना आणि भगिनींना डाबर ह्या नामांकित कंपनीच्या रिअल फ्रेश फ्रुट ज्यूसचं आणि डाबर ग्लुकोनडी ह्या एनर्जी ड्रिंक्सचं वाटप देखील करण्यात आले..
सामाजिक कार्यकर्ते दर्शनदादा भोईर,संदेश घरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि निवेदन सादर केले.आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नाझनीन खालील पटेल, गणेश सावंत माजी पं.स.सदस्य,कुरेश सिद्दीकी माजी उपसरपंच,राजू माडे ग्रा.पं.सदस्य,शंकर भोपी अध्यक्ष मच्छिमार सो.आपटा, प्रभाकर शेलार पंच ,दत्तात्रेय भोईर पंच ,राजू सिद्दीकी युवा सा.कार्यकर्ते,आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत, संपेशजी पाटील अध्यक्ष मित्र परिवार, रोशनजी पाटील उपाध्यक्ष ,क्रांतीजी म्हात्रे कार्याध्यक्ष ,समाधान पाटील सा.कार्यकर्ते पिरकोन ,रचित म्हात्रे(गुड्डू ) आणि आपटा कोळीवाडा येथील कोळी बांधवांच्या व भगिनींच्या आणि घेरावाडी,रामाचीवाडी,टोकाचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा अनोखा आदर्शवत कार्यक्रम मोठया उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.