पोलादपूर तालुका रहिवाशी संघ, पुणे यांसकडून पिडीत परशुराम उफाळेंना साठ हजार रुपयांची आर्थिक मदत गरजुंच्या मदतीसाठी पुन्हा धावली संघटना

पोलादपूर तालुका रहिवाशी संघ, पुणे यांसकडून पिडीत परशुराम उफाळेंना साठ हजार रुपयांची आर्थिक मदत

गरजुंच्या मदतीसाठी पुन्हा धावली संघटना

पोलादपूर तालुका रहिवाशी संघ, पुणे यांसकडून पिडीत परशुराम उफाळेंना साठ हजार रुपयांची आर्थिक मदत गरजुंच्या मदतीसाठी पुन्हा धावली संघटना
📰मीडिया वार्ता न्यूज📰
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
*✍🏻 संदिप जाबडे✍🏻*
*भ्रमणध्वनी – ८१४९०४२२६७*

दिनांक – २७ मे २०२२
पोलादपूर(रायगड) – तालुक्यातील पांगळोली या गावी ४ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाढत्या वणव्याच्या चपाट्यात गोठा आल्याने लागलेल्या आगीत उफाळे यांच्या गोठ्यातील १ गायीचा मृत्यू तर ३ जनावरे गंभीररित्या जखमी झाली होती तर उफाळें यांच्या गोठ्याचे तब्बल १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. गायी व म्हशी यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची उपजीविका अवलंबून असल्याने पिडीत कुटुंबास समाजातील विविध घटकांपासून मदत होणे गरजेचे होते. प्रस्तुत प्रतिनिधीस घटनेची माहिती मिळताच प्रतिनिधीने घटनास्थळी धाव घेत पीडिताची बातमी वृत्तवाहिनी वर प्रसारित केली होती. यात पिडीतास सढळ हस्ते मदत करण्याची विनंती देखील करण्यात आली होती.

पोलादपूर तालुका रहिवाशी संघ, पुणे या संघटनेला पांगळोली गावचे समाजसेवक अंकुश घोलप व के पी जगताप यांच्या माध्यमातून ह्या घटनेची माहिती मिळाली. गेल्या ४० वर्षांपासून कोंकणात आपत्ती काळात, दुष्काळग्रस्त भागात, वैद्यकीय उपचारासाठी नेहमीच गरजूंना मदत करत आलेल्या पोलादपूर तालुका रहिवाशी संघ, पुणे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसातच ६० हजार रुपये इतका धनादेश गोळा केला आणि हा धनादेश धामणदेवी गावचे ह.भ.प. कै. शंकर माने यांच्या उत्तरकार्या वेळी संस्थेचे अध्यक्ष कोंकणरत्न किसनराव भोसले व सहकाऱ्यांच्या हस्ते परशुराम उफाळे यांस देण्यास आला. या मदत कार्यात संकल्प ग्रुप पैठण ह्या युवा मंचाने देखील विशेष सहकार्य केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंकणरत्न किसनराव भोसले, कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल कदम, सचिव राजेंद्र मोरे, सहसचिव सचिन पार्टे, खजिनदार ज्ञानेश्वर साळुंखे, सहखजिनदार ज्ञानेश्वर खरोसे, शंकर खरोसे, लहू उतेकर, राजू कदम, पी. टी. जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.