रस्त्याचे काम पाहून जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांवर संतापाने रागावल्या!

रस्त्याचे काम पाहून जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांवर संतापाने रागावल्या!

रस्त्याचे काम पाहून जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांवर संतापाने रागावल्या!

*शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे मो.9325534661*

शहादा : – शहादा तालुक्यातील डामरखेडा जवळील गोमाई नदी पुलाची पाहणी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली पुलाची दुरवस्था पाहून एमएसआरडीसी ठेकेदारांना धारेवर धरले. रस्ते कामासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते त्यांनी पुलाची पाहणी करून पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण करतांना शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्याचे आदेश दिले. यावेळी शहादा प्रांताधिकारी डॉ चेतन गिरासे, तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी, एमएसआरडीसीचे दिलीप वानखेडे, ठेकेदार एजेंसीचा प्रतिनिधी, दक्षता समितीचे सदस्य हरी दत्तू पाटील, डामरखेडा सरपंच दत्तू पाटील, माजी सरपंच सुदाम ठाकरे प्रकाशा, यांच्यासह डांबरखेडा, करजई, बुपकरी, येथील ग्रामस्थ शेतकरी आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी रस्ता आणि पुलाची दुरावस्था दाखवत जिल्हाधिकारी खत्री यांचे लक्ष वेधले. पुलाच्या दोन्ही बाजुच्या कठड्याना तडे गेलेले आहेत पुलावरील सळ्या निखळलेल्या आहेत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले आहे. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले.
शेतकऱ्यांना अधाप मोबदला का देण्यात आलेला नाही याचा जाब विचारला पाहणी नंतर सद्रुरु धर्म शाळेत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पावसाळ्यातपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.