चंद्रपूरकरांच्या भेटीला येतोय जिल्ह्यातील कलाकारांचा ‘झॉलिवूड’

चंद्रपूरकरांच्या भेटीला येतोय जिल्ह्यातील कलाकारांचा ‘झॉलिवूड’

चंद्रपूरकरांच्या भेटीला येतोय जिल्ह्यातील कलाकारांचा ‘झॉलिवूड’

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

चंद्रपूर, 30 मे
विदर्भातील 130 कलाकारांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक कलाकारांची भूमिका असलेला ‘झॉलिवूड’ हा मराठी चित्रपट 3 जून रोजी राज्यातील 480 चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, अशी माहिती चित्रपटाचे मुख्य कलाकार निशा धोंगडे व सपना आवळे यांनी दिली. तब्बल (16) वर्षांचा झाडीपट्टी नाटकातील दीर्घ अनुभव असलेल्या निशा धोंगडे ह्या मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाची साथ येण्याच्या अगोदरच 2019 मध्येच या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पण, कोरोनाकाळात असलेल्या बंदीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भातील झाडीपट्टीतील अनेक कलाकार प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांना आपल्या कलेची चुणूक दाखविण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या चित्रपटाचे निर्देशन तृशांत इंगळे यांचे असून, लेखिका आसावरी नायडू आहे. यात अभिजीत खोब्रागडे व चंद्रपुरातील (देवाडा) येथील शीतल धोंगडे यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुध्दा चंद्रपुरात करण्यात आले आहे , असे निशा धोंगडे व सपना आवळे यांनी मीडियावार्ता न्युज टीम शी बोलताना सांगितले.
=============================