आदिवासी एकता मंच कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्य पूर्ती सोहळा उत्साहात पार पडला
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- आदिवासी एकता मंच कर्मचारी संघटना तर्फे आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील आश्रम शाळे मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा आज यावल प्रकल्प कार्यालयाच्या आवारात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. बी. तडवी सर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वनिताजी सोनवणे मॅडम ह्या होत्या, कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा, महामानव बाबासाहेब आंबेडकर व देशाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून केली,आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृह यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक व परिवारासह त्यांचा सत्कार करण्यात आला या मध्ये, रामचंद्र मोरे, मंगलाबाई चव्हाण, ईश्वर पारधी, अहमद तडवी, वैजनाथ नाईक, हैदर तडवी, हरी चव्हाण, सुपडू पाटील, उषाताई ठाकूर, जहांगीर तडवी, गणेश तळेले, रामकृष्ण महाजन, वासुदेव नेरकर, रंजना ताई कोळी, सुरेखाताई भालेराव,हिरामण सोनवणे,कमलाताई शिंदे, इत्यादी कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळ्यात सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या प्रसंगी आदिवासी प्रकल्प आढावा समितीच्या सदस्य सौ जुबेदा बाई मुजात तडवी व सदस्य प्रताप भाऊ बारेला हे उपस्थित होते तसेच स. प्र.अधिकारी जे.आय.तडवी, स.प्र.अ पवन कुमार पाटील तसेच सौ एम आर सुलताने मॅडम, एम पी.राणे साहेब. एस आर पाटील साहेब, यावल येथील गृहपाल आर. आर. कोचुरे जळगाव गृहपाल गाढे सर,प्रकल्प कार्यालयातील श्री वाय एस पवार श्री भोई प्रकल्प कार्यालय कार्यालय अधीक्षक श्री झांबरे तसेच चांदसर येथील मुख्याध्यापक देशपांडे सर, देवझिरी मुख्याध्यापक सुनील चौधरी सर,डोंगर कोठारा येथील मुख्याध्यापक वानखेडे सर,संदेश सोनवणे सर, पळासखेडा मुख्याध्यापक आर एस तायडे सर
जोंधनखेडा येथील मुख्याध्यापक सचिन गायकवाड सर कृष्णापुर येथील अधीक्षक सुहास देवराज,चांदसर येथील अधीक्षक गजरे सर जोंधनखेडा अधीक्षक पंकज फेगडे डोंगर कठोरा येथील अधीक्षक बारी सर लालमाती येथील श्री आर एस पाटील सर श्री सैंदाणे सर प्रकल्प कार्यालयातील लिपिक बबलू तडवी इत्यादी मान्यवरांचा एकता मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच यावल प्रकल्पातील प्रकल्प अध्यक्ष दस्तगीर तडवी, प्रकल्प उपाध्यक्ष विजयानंद सुरवाडे, प्रकल्प सचिव निलेश तडवी, महिला अध्यक्ष मोनिका खरात, कार्याध्यक्ष प्रदीप बारेला, उपाध्यक्ष पुष्पलता जाधव ,प्रकल्प सल्लागार भरत भेंडवाल ,प्रकल्प खजिनदार न्याजोद्दिन तडवी, दीपक सोनवणे उल्हास पाटील ,समशेर दादा ,सुरेश साळुंखे, खराटे सर, नवल राठोड, मनोज उजडेकर, अल्लाउद्दीन तडवी, राजू तडवी, श्री हटकर दादा यांनी व प्रकल्पातील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
या प्रसंगी प्रकल्प अधिकारी विनिताजी सोनवणे यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे समस्यांचे निराकरण करण्यात येईल व सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले, भूपेंद्र पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सत्कार मूर्तींचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालमाती येथील अधीक्षक व एकता मंच चे राज्य सदस्य मनीष तडवी सर यांनी केले